T20 World Cup 2024: भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) मध्ये सुपर-8 चा पहिला सामना काल (20 जून) अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.


प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 8, विराट कोहली 24 आणि ऋषभ पंत 20 धावा करत बाद झाला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानसमोर भारताचे सलामीवीर गडगडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला. सूर्यकुमारने 28 चेंडूत 53 धावा केल्या. तर हार्दिक पांड्या 24 चेंडूत 32 धावा करत बाद झाला. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने 3, फजलहक फारुकी 3 आणि नवीन उल हकने 1 विकेट घेतली. 


राशिद अन् सूर्यकुमार यांच्यात मजेशीर भांडण-


या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तरीही भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. या विजयासोबतच खेळपट्टीवर सूर्यकुमार यादव आणि राशिद खान यांच्यातील मजेदार भांडणही व्हायरल होत आहे. टी-20 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या सूर्यकुमार यादवने आपल्या चमकदार कामगिरीने राशिद खानची रणनीती मोडून काढली. राशिद खानच्या फिरकीसमोर भारताच्या सलामीवीरांची कोंडी झाली. मात्र सूर्यकुमारने राशिद खानच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार टोलावले. यानंतर राशिद खान आणि सूर्यकुमारमध्ये मजेशीर भांडणही पाहायला मिळाले.  






पुढील सर्व सामन्यात तीन फिरकीपटू खेळणार?


रोहित शर्मा पुढे म्हणाला की, बुमराह आमच्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. त्याचा चांगला वापर करणे महत्त्वाचे आहे. तो एक असा खेळाडू आहे जो जबाबदारी घेण्यास तयार असतो. तो जिथेही खेळतो, तो नेहमीच जबाबदारी घेतो. मला परिस्थितीचे आकलन करावे लागेल. विरोधी संघ पाहता, आम्ही कोणतेही बदल करण्यास तयार आहोत. आम्हाला वाटले की तीन फिरकीपटू चांगले असतील, म्हणून आम्ही त्यासाठी गेलो. जर गरज पडली तर आम्ही करू शकतो, असं रोहित शर्माने सांगितले.


संबंधित बातम्या:


Team India Head Coach: गौतम गंभीर नव्हे, व्हीव्हीएस लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा?; महत्वाची अपडेट आली समोर


T20 World Cup 2024: आगामी सर्व सामन्यात तीन फिरकीपटू खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने सांगितले रहस्य!


T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम