न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडून यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024)आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 8 सामने खेळवण्यात आले. यामध्ये भारताच्या तीन मॅचेसच समावेश होता. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची ( New York Nassau County stadium ) खूप चर्चा झाली. या स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत राहिली. या मैदानावर लो स्कोअरिंग मॅचेस झाल्या. गोलंदाजांना या मौदानावर फायदा मिळाला.हे मैदान अस्थायी स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅचनंतर मैदानाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे.  


पार्कमध्ये बनवलेलं मैदान


बुधवारपासून स्टेडियम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कमधील आयजनहावर पार्कमध्ये बांधण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.  या पार्कमधून नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिमय गायब होईल.  






न्यूयॉर्कचं नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम इतिहासात नोंदवलं गेलं आहे. या मैदानाची निर्मिती 106 दिवसांमध्ये करण्यात आली होती. या मैदानाची प्रेक्षक क्षमता 34 हजार इतकी होती. या मैदानाच्या स्टँडचा वापर गोल्फ स्पर्धा आणि फॉर्म्युला वन स्पर्धांमध्ये करण्यात आला होता.  


न्यूयॉर्कमधील या मैदानाच्या उभारणीचा खर्च 30 मिलियन डॉलर होता. या मैदानाची निर्मिती 8 महिन्यात करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड ओवल स्टेडियमवरुन विशेष माती मागवण्यात आली होती. हे स्टेडियम पुढील 6 आठवड्यात पूर्णपणे हटवण्यात येईल.   


नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आठ मॅच खेळवण्यात आल्या. इथं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तीन संघानं विजय मिळवला. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं पाचवेळा विजय मिळवला. भारतानं  दोन वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक 137 धावा केल्या होत्या. कॅनडानं ती मॅच 12 धावांनी जिंकली होती.  


दरम्यान, भारतानं या मैदानावर सर्वाधिक तीन सामन्यात विजय मिळवला. भारताची ग्रुप स्टेजमधील अखेरची मॅच कॅनडा विरुद्ध होणार आहे. ही मॅच फ्लोरिडात होईल. भारतानं सुपर 8 मधील प्रवेश निश्चित केला आहे.


संबंधित बातम्या : 


IND vs USA : अर्शदीपनं वात पेटवत अमेरिकेला धक्के दिले, नितीश कुमारची कडवी झुंज, भारतापुढं किती धावांचं आव्हान?


T20 World Cup 2024: अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये पूरसदृश परिस्थिती, अनेक वाहनं पाण्याखाली; विश्वचषकाची समीकरणं बदलण्याची शक्यता