T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) 25 व्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करून सुपर-8 साठी पात्रता मिळवली. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 


2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत आहेत, ज्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये आहे. ग्रुप-ए टीम इंडिया सुपर-8 चा पहिला सामना ग्रुप-सी मधील नंबर वन टीमसोबत खेळेल आणि त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना डी गटातील नंबर दोन संघाशी होईल. त्यानंतर सुपर-8 मध्ये टीम इंडिया आपला शेवटचा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.






टीम इंडिया ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळणार-


टीम इंडियाला शेवटचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा आहे. भारत आणि कॅनडा यांच्यात होणारा सामना शनिवारी 15 जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. टीम इंडियाने पहिले तीन सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळले. कॅनडाविरुद्धचा शेवटचा सामना भारतासाठी फारसा महत्त्वाचा ठरणार नाही कारण संघ आधीच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे.






टीम इंडियाची Super 8 मध्ये एन्ट्री


टी 20 विश्वचषकात सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून टीम इंडियाने Super 8 मध्ये एन्ट्री मारली. अमेरिकेच्या 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अपयशानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव व शिबम दुबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अमेरिकेला पराभूत केले. तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने 4 षटकांत 9 धावांत 4 विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला 8 बाद 110 धावा करता आल्या.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Saurabh Netravalkar: केशवा माधवा, मन उधाण वाऱ्याचे ते राधा ही बावरीपर्यंत; अमेरिकेचा वेगवान गोलंदाज मराठी गाणं गातो तेव्हा..., Video


T20 World Cup 2024 Ind vs USA: पहिले विराट कोहली, मग रोहित शर्माला माघारी धाडलं; कोण आहे सौरभ नेत्रावळकर?