न्यूयॉर्क : अमेरिकेनं भारतापुढं (USA vs IND) विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेटनं विजय मिळवला. या विजयासह भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केलं. सूर्यकुमार यादवनं 50 धावा केल्या. तर, शिवम दुबे यानं देखील त्याला 31 धावा करत साथ दिली.  रिषभ पंतनं 18 धावा केल्या. आजच्या मॅचमध्ये अर्शदीप सिंग आणि अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची गोलंदाजी लक्षात राहिली. अर्शदीप सिंगनं अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. तर, सौरभ नेत्रावळकरनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केलं.  


सूर्यकुमार यादवला  सूर गवसला


टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं मोक्याच्या क्षणी दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवनं 50 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं शिवम दुबेच्या साथीनं विजयापर्यंत पोहोचवलं. त्यापूर्वी अर्शदीप सिंगनं अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. 


सौरभ नेत्रावळकरचे भारताला धक्के


मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरनं भारताचा डाव सुरु होताच. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला धक्का दिला. विराट कोहलीला त्यानं शुन्यावर बाद केलं. विराट कोहली टी 20 वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  सौरभ नेत्रावळकरनं पुढं रोहित शर्माला 3 धावांवर बाद केलं. 


अमेरिकेनं भारताला विजयासाठी 111 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताच्या सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांच्या जोडीनं भारताला विजय मिळवून दिला. भारतानं अमेरिकेला 8 विकेटवर 110 धावांवर रोखलं होतं. अमेरिकेकडून नितीश कुमारनं सर्वाधिक 27 धावा  केल्या. 


भारतानं मॅच जिंकली, सुपर 8 मध्ये प्रवेश केला पण शाबास अमेरिका असं म्हणायला हवं, असं क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले म्हणाले. भारताला अमेरिकेनं झुंजवलं ते पाहायला मजा आली, असं त्यांनी म्हटलं. अर्शदीप सिंगनं पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. कागदावर छोटी दिसणारी 110 ही धावसंख्या पार करताना भारतीय संघाला गार हवेत अमेरिकेच्या संघानं घाम फोडला, असं सुनंदन लेले म्हणाले. 


सौरभ नेत्रावळकरनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केलं. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या 67 धावांच्या भागिदारीमुळं भारताला विजय मिळाला. सूर्यकुमार यादवनं जबाबदारी ओळखून केलेली कामगिरी ही त्याला जबाबदारीचं भान असल्याचं दाखवून देणारी होती, असं सुनंदन लेले म्हणाले. 


दरम्यान, भारतीय संघानं अमेरिकेला पराभूत करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. आजच्या मॅचचा सामनावीर पुरस्कार अर्शदीप सिंगला देण्यात आला. 


संबंधित बातम्या : 



Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कमबॅक कसं केलं, टीम इंडियाच्या कोचनं गुपित सांगितलं...