T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आज भारताला पराभूत करू शकला नाही तर सुपर-8मध्ये जाण्याचा मार्ग खडतर होऊ शकतो. 


अ गटाची गुणतालिकेची स्थिती काय आहे?


सध्या, यजमान यूएसए +0.626 च्या नेटरन रेटसह 2 सामन्यांतून 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्याचा नेट रनरेट +0.3065 आहे. कॅनडा 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान आणि आयर्लंड यांना अद्याप एकही गुण मिळवता आलेला नाही, जे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.


पाकिस्तान सुपर-8 मध्ये जाऊ शकतो का?


पाकिस्तान संघाने अ गटातील आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तरी त्यांना सुपर-8 फेरीतून बाहेर पडावे लागू शकते. भारत, पाकिस्तान आणि अमेरिका यांचे 6 गुण असू शकतात, असं सध्याच्या परिस्थितीनूसार दिसून येतंय.अशा परिस्थितीत नेट रनरेटच्या आधारे 2 संघ सुपर-8 मध्ये जातील. भारत आणि अमेरिकेच्या तुलनेत पाकिस्तानचा  नेट रनरेट खूपच खराब असल्याने, सध्या सुपर-8 मध्ये जाणे जवळजवळ अशक्य आहे.


पाकिस्तान सुपर-8 मध्ये कसा पोहोचेल?


पाकिस्तानला सुपर 8 च्या फेरीत जाण्यासाठी अमेरिकेच्या संघावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे पुढील दोन्ही सामन्यात अमेरिकेचा पराभव होईल, अशी आशा पाकिस्तान संघाला करावी लागेल. केवळ अमेरिकाच नाही तर पाकिस्तान संघाला पुढील सर्व सामने जिंकावे लागतील. पण सध्या पाकिस्तानला सुपर-8 मध्ये जाणं अवघड नसलं तरी सध्यातरी ते अशक्य वाटतंय.


टी-20 विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार-


वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.  2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते. 


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकातील 20 संघाचा Full Squad अन् संपूर्ण वेळापत्रक, सामने कुठे बघाल? पाहा एका क्लिकवर