T20 World Cup 2024 Ind vs Pak Rohit Sharma On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे, जो स्पर्धेतील 18 वा सामना असेल. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारत आणि पाकिस्तानचा टी-20 विश्वचषकातील हा दुसरा सामना असेल.


पाकिस्तानला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करायला लागला होता. तर भारताने आयर्लंडविरुद्ध विजयी सुरुवात केली आहे. भारताविरुद्धचा सामन्यात विजय मिळवणं पाकिस्तानसाठी महत्वाचं असणार आहे. भारताकडून आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सलामीवीरची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येणार की यशस्वी जैस्वाल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच आयर्लंविरुद्ध संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज अक्षर पटेलच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.


पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.


भारताचा संपूर्ण संघ:


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 


राखीव खेळाडू- शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद 


पाकिस्तानचा संपूर्ण संघ-


बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रिदी, उस्मान खान


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Ind vs Pak: शाहीन अफ्रिदीने जसप्रीत बुमराहच्या मुलाला दिलं होतं गिफ्ट; संजना म्हणाली, अंगद ते आजही वापरतोय...


T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर