सेंट लूसिया : टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2024) दुसऱ्या सुपर 8 च्या लढतीचा फैसला अखेर झाला आहे. इंग्लंडनं (England) यजमान वेस्ट इंडिजला (West Indies) पराभूत केलं आहे. इंग्लंडनं 8 विकेटनं दणदणीत विजय मिळवून देत पुढचं पाऊल टाकलंय. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजनं 20  ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडनं 18 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवला. इंग्लंडकडून फिल सॉल्टनं दमदार कामगिरी केली. फिल सॉल्टनं नाबाद  87 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. फिल सॉल्ट आणि जॉनी बेयरस्टो या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडनं विजयाला गवसणी घातली. 


वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर बीए किंग 23 धावा करुन रिटायर हर्ट झाला. वेस्ट इंडिजच्या चार्ल्सनं  38, निकोलस पूरन यानं 36 , रोव्हमन पॉवेल  यानं 36 धावा केल्या. रुदरफोर्डनं 28 धावांची खेळी केली. यामुळं वेस्ट इंडिजच्या संघानं 20 ओव्हरमध्ये 1 विकेटवर 180 धावा केल्या.  मात्र, धक्कादायक बाब म्हणजे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जवळपास 49 बॉलवर एकही रन काढली नाही.


फिल सॉल्टनं इंग्लंडला एकहाती विजय मिळवून दिला


इंग्लंडला सुपर  8 मध्ये प्रवेश मिळेल की नाही अशी स्थिती असताना ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत केल्यानं त्यांना पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला. आजच्या मॅचमध्ये फिल सॉल्ट आणि जोस बटलरनं आक्रमक सुरुवात केली. जोस बटलर  22 धावा करुन बाद झाला. यानंतर फिल सॉल्टनं 5 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर नाबाद  87  धावांची खेळी केली. या खेळीनं इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. तर, मोईन अली  13 धावा करुन बाद झाला. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या जॉनी बेयरस्टोनं संघाला विजय मिळवून देण्याासाठी फिल सॉल्टची मदत केली. जॉनी बेयरस्टोनं नाबाद  48 धावा केल्या. 


वेस्ट इंडिजचा स्पर्धेतील पहिला पराभव 


वेस्ट इंडिजनं ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते. अफगाणिस्तान विरुद्ध 100 हून अधिक धावांनी मॅच जिंकल्यानं वेस्ट इंडिजचा आत्मविश्वास वाढला होता. आजच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं 180 धावा केल्या. मात्र, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी फलंदाजी करताना जे चेंडू डॉट खेळले ते त्यांच्या अंगलट आले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी 49 बॉल डॉट खेळले. म्हणजेच जवळपास 8 ओव्हर वेस्ट इंडिजनं रन केल्या नाहीत. तर, इंग्लंडनं केवळ 16 बॉल डॉट खेळले. इंग्लंडनं वेस्ट इंडिजला 8 विकेटनं पराभूत केलं. वेस्ट इंडिजचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. ग्रुप स्टेजमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव झाला नव्हता. 


संंबधित बातम्या : 


अफगाणिस्तान या फॉरमॅटमध्ये सर्वात धोकादायक संघ, द्रविड गुरुजींचा टीम इंडियाच्या शिलेदारांना इशारा

 

सुपर 8 मध्ये तुम्हाला खरा विराट कोहली पाहायला मिळेल, इरफान पठाण प्रचंड आशावादी