T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आजच्या दिवसातील दुसरा सामना श्रीलंका संघाने युएईला (SL vs UAE) 79 धावांनी मात देत जिंकला आहे. यावेळी युएईचा युवा फिरकीपटू कार्तिक मयप्पनने (Karthik Meiyappan) यंदाच्या विश्वचषकातील पहिली वहिली हॅट्रीक घेतली खरी पण तरी युएईच्या फलंदाजांना खास कामगिरी करता न आल्याने 79 धावांनी सामना यूएईला गमवावा लागला. यावेळी आधी फलंदाजी करत श्रीलंका संघाने 153 धावांचे आव्हान युएईला दिले होते, पण युएईचा संघ 73 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे सामना श्रीलंकेने 79 रनांनी जिंकला.
सामन्यात आधी टॉस जिंकत युएई संघाने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर श्रीलंकेची सुरुवातही दमदार झाली त्यांचा सलामीवीर पाथुम निसांकाने सुरुवातीपासून तुफान खेळी कायम ठेवली. कुसल मेंडीस 18 धावा करुन बाद झाला. मग धनजंया डी सिल्वाने 33 धावांची तडाखेबाज खेळी केली. तो बाद झाला तरी पाथुम क्रिजवर कायम होता. त्यानंतर मात्र युएईच्या कार्तिकने तीन गडी सलग बाद करत दमदार सुरु असलेला श्रीलंकेचा खेळ रोखला. पाथुमने सामन्यात 60 चेंडूत 74 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर श्रीलंका संघाने 152 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
153 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या युएई संघाचे फलंदाज मात्र साफ फेल झाल्याचं दिसून आलं. त्याच्या अयान अफझल खानने सर्वाधिक 19 तर जुनेद सिद्दीकने 18धावा केल्या. इतर फलंदाज स्वस्तातच तंबूत परतल्याने युएईचा संघ 17.1 षटकात 73 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना श्रीलंकेने 79 रनांनी जिंकला. विशेष म्हणजे युएईच्या कार्तिकनं हॅट्रिक घेऊनही फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे सामना युएईला गमवावा लागला. त्यामुळे सामनावीराचा पुरस्कार कार्तिकला न मिळता 74 धावा करणाऱ्या श्रीलंकेच्या पाथुमला मिळाला.
कार्तिकची हॅट्रिक पाहिलत का?
श्रीलंका संघाने सुरुवातीपासून जबरदस्त फलंदाजी सुरु केली. त्यांचा स्कोर 200 पार जाईल असं वाटत होतं. पण त्याचवेळी युएईचा लेगब्रेक गोलंदाज कार्तिकने 15 वी ओव्हर टाकत श्रीलंकेच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. यावेळी कार्तिकने 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षाला 5 धावांवर असलांकासह श्रीलंकन कर्णधार शनाकाला 0 धावांवर तंबूत धाडलं. ज्यामुळे श्रीलंकेचा स्कोर 152 इतकाच होऊ शकला.
पाहा कार्तिकनं घेतलेली हॅट्रिक
हे देखील वाचा-