T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात (Australia) उद्यापासून आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होईल. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेतील पहिल्या श्रीलंका विरुद्ध नामीबिया आमने सामने येणार आहेत. तर, भारतीय संघ त्यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरणार आहेत, ज्यातील 12 संघ सुपर-12 मध्ये खेळताना दिसतील. महत्वाचं म्हणजे, सलग दुसऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात असल्यानं सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. यामागचं कारण आणि टी-20 विश्वचषकाच्या संबंधित A टू Z माहितीवर एक नजर टाकुयात.
टी-20 विश्वचषकाची ही कोणती आवृत्ती असेल?दरम्यान, 2007 मध्ये पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या या स्पर्धेत भारत चॅम्पियन ठरला. तेव्हापासून आतापर्यंत टी-20 विश्वचषकाच्या सहा आवृती खेळल्या गेल्या. ऑस्ट्रेलियात उद्यापासून खेळली जाणारी ही टी-20 विश्वचषकाची आठवी आवृत्ती असेल. वेस्ट इंडीजच्या संघानं सर्वाधिक दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
सलग दोन वर्षे विश्वचषकाचं आयोजन, कारण काय?2010 पासून दर दोन वर्षांनी टी-20 विश्वचषकाचे आयोजन केले जात होते. परंतु 2016 नंतर त्यात पाच वर्षांचे अंतर होते. तर, कोरोना महामारीमुळं 2020 मध्ये टी-20 विश्वचषक होऊ शकला नाही. म्हणूनच सलग दोन वर्षे टी-20 विश्वचषकाचं आयोजन केलं जात आहे. ही स्पर्धा 2018 मध्ये होणार होती, परंतु द्विपक्षीय मालिकेमुळं कॅलेंडर खूप व्यस्त असल्यानं ही स्पर्धा होऊ शकली नाही.
या विश्वचषकात वेगळं काय असेल?आयसीसीच्या नव्या नियमांनुसार यंदाचा टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकतेच काही नियम बदलले आहेत. या विश्वचषकात नॉन-स्ट्रायकर गोलंदाजी करण्यापूर्वी रन आऊट होताना पाहायला मिळतील, जे यापूर्वी अवैद्य मानलं जातं होतं. यांसह अनेक नियामांत बदल करण्यात आलाय.
यंदाच्या विश्वचषकाचा फॉर्मेट, कोणकोणते संघ सहभागी होणार?ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूजीलैंड, अफगानिस्तान ग्रुप अ मध्ये असतील. तर, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रीकेच्या संघाचा ग्रुप ब मध्ये समावेश करण्यात आलाय, ज्यांनी अगोदरचं सुपर-12 मध्ये स्थान मिळवलंय. उद्यापासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून पहिल्या राऊंड खेळला जाईल. ज्यात श्रीलंका, नेदरलँड्स, यूएई, नामीबिया, आयर्लंड, वेस्ट इंडीज, स्कॉटलँड आणि झिम्बाब्वेचा संघ असेल. यातील दोन ग्रुपमधील प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर -12 मध्ये पोहचतील.
कुठं रंगणार सामने?टी-20 विश्वचषकातील सामने होबर्ट, सिडनी, पर्थ, ब्रिसबेन आणि एडिलेड येथे खेळले जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेत भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-