T20 World Cup 2021 Points Table : विश्वचषकात आतापर्यंत 12 सामने झाले आहेत. यामध्ये श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका,  वेस्टविंडीज, ऑस्ट्रेलिया नामिबिया आणि अफगानिस्तान या संघानं विजय मिळवला आहे. बांगलादेश, भारत, न्यूझीलंड आणि स्कॉटलँड संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही.  सलग तीन पराभवानंतर बांगलादेश संघाचं स्पर्धेतील आव्हान संपलं आहे. तर गुणतालिकेत नामेबियाचा संघही भारतापेक्षा वरील क्रमांकावर आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा सुपर-12 नुसार होत आहे. दोन गटात 12 संघ विभागले आहेत. अ ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट विडिंज, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर ब ग्रुपमध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामेबिया आणि स्कॉटलँड या संघांचा समावेश आहे. सहा विजयासह पाकिस्तानचा संघ ब गटात पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर 00 गुणांसह भारत तळाशी आहे. चार गुणांसह इंग्लंड अ गटांमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर बांगलादेश 00 गुणांसह तळाशी आहे. 

पाहा गुणतालिका -

अ गट

संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
इंग्लंड 2 2 0 4 +3.614
ऑस्ट्रेलिया 2 2 0 4 +0.727
दक्षिण आफ्रिका 2 1 1 2 +0.179
श्रीलंका 2 1 1 2 -1.598
वेस्ट विडिंज 3 1 2 2 -2.550 
बांगलादेश 3 0 3 0 -1.069

ब गट गुणतालिका

संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
पाकिस्तान 3 3 0 6 +0.638 
अफगाणिस्तान 2 1 1 2 +3.092 
नामेबिया 1 1 0 2 +0.550 
न्यूझीलंड 1 0 1 0 -0.532 
भारत 1 0 1 0 -0.973 
स्कॉटलँड 2 0 0 0 -3.562

सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारतीय संघाला सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे. पाकिस्तानविरोधातील पराभवानंतर भारतीय संघाला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागणार आहे. भारतीय संघाचे उर्वरित सामने न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामेबिया यांच्यासोबत आहेत. भारतीय संघाचा पुढील सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरोधात होणार आहे.