BAN vs ENG T20 World Cup 2021 : सुपर-12 मध्ये सलग तीन पराभव स्विकारावे लागल्यानंतर बांगलादेश संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट विडिंज संघानं अखेरच्या चेंडूवर विजय मिळत आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे.  बांगलादेश आणि वेस्ट विडिंज यांच्यासाठी हा सामना करो किंवा मरो असा होता. महत्वाच्या सामन्यात वेस्ट विडिंज संघानं विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. 


बांग्लादेश संघाला टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup-2021) लागोपाठ तीन पराभवाचा सामना करावा लागला.  शारजाह येथे झालेल्या सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट विडिंज संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या पराभवासह बांगलादेशच्या  सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. वेस्ट विडिंज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धिरित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकांत 139 धावांपर्यंत मजल मारु शकला. यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran) 22 चेंडूत चार षटकारांसह 40 धावांचा पाऊस पाडला. बांगलादेश संघाला अखेरच्या षटकांत विजयासाठी 13 धावांची गरज होती.  रसेलनं अचूक टप्यावर गोलंदाजी करत धावांचा बचाव केला. 


करो या मरोच्या सामन्यात बांगलादेश संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह बांगलादेश संघाचं आव्हान जवळपास संपलं आहे. श्रीलंका, इंग्लंड आणि वेस्ट विडिंजकडून बांगलादेश संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अ गटाच्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ तळाशी आहे. बांगलादेशचे उर्वरित सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात आहेत. या दोन्ही सामन्यात विजय मिळवून बांगलादेशचा संघ सेमीफायनलचे गणित बदलू शकतो. वेस्ट विडिंज संघाला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी वेस्ट विडिंज संघाला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरोधात वेस्ट विडिंज संघाचे उर्वरित दोन सामने आहेत.