Australia to tour Pakistan for first time : तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा (Austrelia cricket Team) संघ पाकिस्तान (pakistan cricket Team) दौऱ्यावर येणार आहे. Pakistan Cricket बोर्डानं ही माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा (Australia Tour Of Pakistan) मार्च 2022 मध्ये प्रस्तावित आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी20 सामना खेळला जाणार आहे. हे सामने कराची, रावलपिंडी आणि लाहोरमध्ये खेळले जाणार आहेत.   ऑस्ट्रेलियाचा हा  24 वर्षांनंतरचा पहिला पाकिस्तान दौरा असणार आहे.  टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचा मुकाबला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी ही बातमी समोर आली आहे. 






 


टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी महत्वाची माहिती समोर आलीय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पुढील वर्षी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि एकमेव टी-20 सामना खेळला जाईल


आस्ट्रेलियाचा  24 वर्षानंतर  पाकिस्तान दौरा-


ऑस्ट्रेलियाने 1998-99 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केलाय. या दौऱ्यात मार्क टेलरने पेशावरमध्ये नाबाद 334 धावांची खेळी केली होती. मार्क टेलरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मालिका 1-0 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने 1959-60 नंतर पाकिस्तानमध्ये ही पहिली कसोटी मालिका जिंकली होती. दरम्यान, 1998 नंतरही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा संघ अनेकदा आमने-सामने आले. परंतु, हे सर्व सामने पाकिस्तानबाहेर खेळण्यात आले. यातील 3 मालिका यूएईमध्ये तर, एक मालिका इंग्लंडमध्ये खेळण्यात आली. पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियासोबत अखेरची मालिका 2018-19 मध्ये खेळली होती. ही मालिका पाकिस्ताने 1-0 ने जिंकली होती. 


वेळापत्रक- 


कसोटी मालिका-
 
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च महिन्यात 3-7 दरम्यान पहिला कसोटी सामना होणार आहे. हा सामना कराची येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना रावलपिंडी मैदानात 12-16 मार्च दरम्यान खेळला जाणार आहे. तर, अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना लहोरच्या मैदानात 21-25 मार्च दरम्यान होईल.


एकदिवसीय मालिका- 


कसोटी मालिकेनंतर पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. पहिला सामना 29 मार्चला खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 31 मार्च आणि तिसरा सामना 2 एप्रिलला होणार आहे. हे सर्व सामने लहौरच्या मैदानात पार पडणार आहेत.  


टी-20 सामना-


कसोटी आणि एकदिवसीय मालिका पार पडल्यानंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव टी-20 सामना खेळला जाईल. हा सामना 5 एप्रिलला लाहोरच्या मैदानावर खेळला जाईल.