T20 World Cup 2021: डावखुरा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमन आणि जेन फ्रायलिंक यांच्या तुफानी गोलंदाजीमुळे नामिबियाने बुधवारी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यातील गट 'ब' मध्ये स्कॉटलंडला (Scotland Vs Namibia) 4 विकेट्सने पराभूत केले. पहिल्याच षटकात 3 बळी घेणारा ट्रम्पेलमन आणि फ्रायलिंक यांच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संघ आठ बाद 109 धावाच करू शकला. सहावा सामना खेळत ट्रम्पमनची कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.


स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक 44 धावा केल्या. त्यांच्याशिवाय केवळ ख्रिस ग्रीव्हज (25) आणि सलामीवीर मॅथ्यू क्रॉस (19) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. प्रत्युत्तरात जेजे स्मित (23 धावा) केल्या. यात दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. सलामीवीर क्रेग विल्यम्स (23) यांच्या खेळीच्या बळावर नामिबियाने 4 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. 


मायकेल व्हॅन लिंगेन (18) आणि विल्यम्स यांनी पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. व्हॅन लिंगेनने जोश डेव्हीला लागोपाठ दोन चौकार मारले. पण सफायान शरीफने त्याला झेलबाद केले. नामिबियाने पॉवर प्लेमध्ये एक बाद 29 धावा केल्या. त्यानंतर विल्यम्स आणि जेम्स ग्रीन (09) यांनी डाव पुढे नेला. ग्रीनने ख्रिस ग्रीव्हजच्या बॉलवर चौकार मारला. तर, विल्यम्सने मार्क वॅटला डावातील पहिला षटकार ठोकून नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले.


ग्रीव्हजने ग्रीनला मुनसेच्या हाती झेल देऊन नामिबियाला दुसरा धक्का दिला. लिस्कनेनंतर कर्णधार गेरहार्ड इरास्मसला (04) बोल्ड केले. तर, वॉटने विलियम्स को स्टम्प केले. तेव्हा नामिबियाचा स्कोर चार विकेट्स 67 धावा होत्या.  त्यानंतर स्मित आणि डेव्हिड विसे (16) यांनी आघाडी घेतली. शेवटच्या सहा षटकांत नामिबियाला विजयासाठी 35 धावांची गरज होती. स्मितने शरीफला चौकार मारल्यानंतर ग्रीव्हजने बॉल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. वायसीनेही लीस्टला षटकार ठोकला. परंतु, याच गोलंदाजीवर त्याने विकेट्स गमावला. 


नामिबियाला शेवटच्या दोन षटकांत 7 धावांची गरज होती. स्मितने ब्रॅडली व्हीलवर चौकार मारून धावसंख्या बरोबरी केली. त्यानंतर  पुढच्या बॉलवर फ्रायलिंक (02) विकेट्स गेला. स्मितने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शरीफला षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.


संबंधित बातम्या-