T20 WC 2021 Final Match: टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ Vs AUS) एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघाकडं आजचा सामना जिंकून टी-20 विश्वचषक 2021 चा खिताब जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आरोन फिंच  (Aaron Finch) संभाळत आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व केन विल्यमसन  (Kane Williamson) करीत आहे. आरोन फिंच आणि केन विल्यमसन यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही संघ जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत इंग्लंडचा तर, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिलीय. 


यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघानं चांगली कामगिरी करून दाखवलीय. या स्पर्धेत दोन्ही संघानं एकूण 6 सामने खेळले आहेत. तर, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाला एक- एक सामना गमवाव लागलाय. 


टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुबई आतंरराष्ट्रीय स्डेडिअमवर सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय, तुम्ही ऑफ डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.  याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. 


संघ-


न्यूझीलंड संभाव्य संघ:


मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साउथी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट


ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ:


आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha