मुंबई : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 मालिका नुकतीच पार पडली. भारतानं (Team India) या मालिकेत श्रीलंकेला 3-0 नं पराभूत केलं. भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं होतं. या मालिकेत सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) यशस्वीपणे नेतृत्त्व करत भारताला विजय मिळवून दिला होता. सूर्यकुमार यादवची भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून निवड जाहीर करताना निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवचा विचार केवळ टी 20 संघासाठी करण्यात आला, त्याचा वनडे मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही, असं म्हटलं होतं. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना अजून बराच कालावधी असल्यानं विविध खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. सूर्यकुमार यादवनं मुंबई क्रिकेट असोसिएशनला बुची बाबू स्पर्धेत खेळणार असल्याचं कळवलं आहे. 


इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमार यादवनं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख संजय पाटील यांना बुची बाबू स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. या स्पर्धेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत 25 ऑगस्टपासून सहभागी होईल. मुंबईकडून खेळण्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे, असं देखील सूर्यानं म्हटलं. 


मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी सूर्यकुमार यादवनं बुची बाबू स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं असल्याचं म्हटलं. सूर्यकुमार यादव जेव्हा वेळ असेल तेव्हा मुंबई क्रिकेटसाठी उपलब्ध असतो, असंही सूत्रांनी म्हटलं.


सूर्यकुमार यादव सरफराज खानच्या नेतृत्त्वात खेळणार


मुंबई क्रिकेट टीमचा कॅप्टन म्हणून सरफराज खान नेतत्त्व करत आहे. सूर्यकुमार यादव भारताच्या टी 20 संघाचं नेतृत्त्व करत असला तरी त्यानं या स्पर्धेत सरफराज खानच्या नेतृत्त्वात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यात बुची बाबू स्पर्धेतील मॅच 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. सूर्यकुमार यादवनं त्याच्या नावाचा समावेश मुंबईच्या संघात करण्याबाबत कळवल्यानं तो या मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना पाहायला मिळेल. 


मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरफराज खानला मुंबईच्या संघाचं नेतृत्त्व करु द्या, अशी सूचना सूर्यकुमार यादवनं सांगितलं आहे. 


दरम्यान, सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाची निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून टी 20 क्रिकेट स्पेशालिस्ट म्हणून पाहिलं जातंय. यामुळं सूर्यकुमार यादवनं देखील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळून निवड समितीनं एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी विचार करावा यासाठी हा निर्णय घेतलेला असू शकतो.  भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता त्या स्पर्धेत सूर्यकुमार यादवनं महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.  


संबंधित बातम्या : 


गौतम गंभीरचे 'हे' तीन निर्णय ठरतायत भारताची डोकेदुखी? इंडियन टीम धडा घेणार का?


IND vs SL : फर्नांडो आणि निसांकाची आक्रमक सुरुवात, रियान परागनं डाव पलटवला, भारतापुढं विजयासाठी किती धावांचं आव्हान?