IND vs IRE, T20 Matches : भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) मागील काही वर्षात एकापेक्षा एक युवा टँलेटड खेळाडू नावारुपाला येत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाची अत्यंत खराब कामगिरी सुरु असतानाही एकमेव चांगला खेळ कऱणारा मुंबईकर म्हणजे सूर्यकुमार यादव. पण आयपीएलमध्येच दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यांसाठी सूर्या संघात नव्हता. पण आता आगामी आयर्लंड दौऱ्यात मात्र सूर्यकुमारला थेट संघात एन्ट्री मिळाली आहे. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. दुखापतीच्या गंभीरतेमुळं तो आयपीएल 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला. याआधी दुखापतीमुळं सूर्यकुमार या हंगामातील सुरूवातीचे तीन सामने खेळू शकला नव्हता. अंगठ्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. पण आता आयर्लंडविरुद्धचा संघ बीसीसीआयने जाहीर केल्यावर यात सूर्यकुमारचं नाव असल्याने त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सूर्यकुमार यादवसह संजू सॅमसन याचंही संघात पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत संघाची घोषणा केली आहे.

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 26 जून डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड 
दुसरा टी20 सामना 28 जून डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड 

हे देखील वाचा-