Wisden T20 Cricketer of the Year Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेटपटू सुर्यकुमार यादव जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाज म्हणून मान (World's The Best T20 Batter Currently in World Cricket) मिळवला आहे. विस्डेन क्रिकेटर्स अल्मानॅक 2023 (Wisden Cricketers Almanack) च्या यादीमध्ये सूर्यकुमार यादवला वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटर (Wisden T20 Cricketer of the Year ) म्हणून निवडण्यात आलं आहे. सुर्यकुमारने 2022 मध्ये भारतीय फलंदाजाने सुमारे 180 च्या स्ट्राइक-रेटने 1431 धावा केल्या, यामध्ये त्याने 10 अर्धशतके आणि तीन शतके अशी चमकदार खेळी केली. यामुळे गेल्या वर्षी टीम इंडिया 40 पैकी 28 सामने जिंकणारा सर्वात यशस्वी संघ ठरला. सूर्यकुमारच्या बॅटने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे तो आता जगभरातील टी20 क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याच कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला विस्डेन अल्मनॅकचा T20 आंतरराष्ट्रीय (T20I) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आलं आहे.


सुर्यकुमार यादव जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाज


सुर्यकुमारने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पण केलं. या सामन्यात त्याने 28 चेंडूत अर्धशतक झळकावून शानदार खेळी केली. सूर्यकुमार यादवला विस्डेन T20I क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष म्हणून निवडण्यात आलं. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने गेल्या वर्षभरात त्याच्या अप्रतिम कामगिरीसाठी हा मान मिळाला आहे. 2022 मध्ये, सुर्यकुमारने एका वर्षात 1000 टी20 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याने नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध आणि माउंट मौनगानुई येथे न्यूझीलंडविरुद्ध दोन शतके ठोकली. त्याने या सर्व धावा 187.43 च्या स्ट्राइक रेटने केल्या आणि मधल्या फळीत फलंदाजी करताना हे त्याची ही खेळी अतुलनीय आहे. त्यामुळे त्याला हा सन्मान देण्यात आला आहे.






आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 पुरस्कार


सुर्यकुमार यादव याने गेल्यावर्षी आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गेल्या वर्षभरात सुर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये एक हजार 164 धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळेच आयसीसीनं सूर्याला क्रिकेटर ऑफ द ईयर 2022  हा पुरस्कार जाहीर केला होता. सूर्याने 2022 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये वादळी खेळी केली. वर्षभरात एक हजार पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला. वर्षभरात 31 सामन्यात सूर्यानं 1164 धावा काढल्या. 187 पेक्षा जास्त स्ट्राइकने सूर्यानं वर्षभरात धावा जमवल्या आहेत. 31 सामन्यात सूर्यानं 68 षटकारांचा पाऊस पाडलाय. सूर्याकुमारच्या याच भन्नाट कामगिरीमुळे आयसीसीनं क्रिकेटर ऑफ द ईयर 2022  म्हणून त्याची निवड केली होती. 


बेन स्टोक्सला 'जगातील आघाडीचा क्रिकेटर'


इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला (England Captain Ben Stokes) 'जगातील आघाडीचा क्रिकेटर' (Leading Cricketer in the World Male) म्हणून गौरविण्यात आले. या 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडला 10 कसोटी सामन्यांत नऊ विजय मिळवून दिला आणि नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या T20 विश्वचषक अंतिम विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या एप्रिलमध्ये स्टोक्सची कर्णधारपदी नियुक्ती होण्यापूर्वी इंग्लंडला त्यांच्या मागील 17 कसोटींमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला होता. त्यामुळे या कामगिरीसाठी त्याचा गौरव करण्यात आला आहे.