Suresh Raina And Rachin Ravindra IPL: आयपीएल 2025 चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी खास राहिला नाही.  या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा संघ 10 व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नईच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैनाला संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चेन्नईत चिन्ना थाला म्हणून ओळख मिळवणाऱ्या सुरेश रैनाची एन्ट्री जवळपास निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे. 

एका वृत्तानूसार, चेन्नई संजू सॅमसनला संघात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आयपीएल 2026 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघात परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका सांभाळू शकतो. चेन्नईकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रचिन रवींद्र चेन्नईच्या संघातून OUT?

चेन्नई संघ दिल्ली कॅपिटल्ससोबत करार करू शकतो, ज्यामध्ये सीएसके दिल्लीसाठी रचिन रवींद्रला सोडू शकते आणि डोनोवन फरेराला संघात समाविष्ट करू शकते. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की दिल्ली कॅपिटल्स नवीन सलामीवीराच्या शोधात आहे, कारण दिल्लीचा संघ फाफ डू प्लेसिसला सोडू इच्छित आहे आणि रचिन रवींद्रला संघात समाविष्ट करू इच्छित आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एका चांगल्या विकेटकीपर-फलंदाजाच्या शोधात-

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एका चांगल्या विकेटकीपर-फलंदाजाच्या शोधात आहेत. पुढील हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी 45 वर्षांचा असेल, त्यामुळे धोनीनंतर संघाला एका चांगल्या खेळाडूची आवश्यकता आहे. त्याचवेळी, केकेआरकडे क्विंटन डी कॉक आणि रहमानुल्ला गुरबाज यांच्या रूपात परदेशी खेळाडू आहेत. त्यांना एका चांगल्या भारतीय विकेटकीपर फलंदाजाची आवश्यकता आहे. आयपीएल ट्रेड विंडो 4 जूनपासून सुरु झाली आहे आणि ती 2026 च्या लिलावाच्या एक आठवड्यापूर्वीपर्यंत चालेल. या काळात, संघ आपापसात खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात.

राज्यातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Ind vs Eng 3rd Test 4th Day VIDEO: चल जा रे, बॉल टाक...; आकाशदीप कार्सला भिडला, पुढच्याच षटकात नको ते घडलं, इंग्लंडचा राडा

Eng vs Ind 3rd Test Day 4 Stumps : लॉर्ड्स कसोटीमध्ये रंजक ट्विस्ट, इंग्लंडचा जबरदस्त पलटवार! इतिहास रचण्यासाठी भारताला 135 धावांची गरज, राहुल-पंत-जडेजावर देशाच्या नजरा