Ind vs Eng 3rd Test 4th Day: तिसऱ्या कसोटीत सावध पवित्र घेतलेल्या यजमान इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांत गुंडाळत भारताने (India vs England 3rd Test) सामन्यावर पकड मिळवली. मात्र, यानंतर आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताची चौथ्य दिवसअखेर 17.4 षटकांत 4 बाद 58 धावा अशी अवस्था झाली. भारताला विजयासाठी अद्याप 135 धावांची गरज आहे. आज तिसऱ्या कसोटीतील पाचवा दिवस असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

लॉर्ड्स कसोटी जसजशी पुढे सरकत आहे तसतसे भारत आणि इंग्लंडमधील वातावरणही तापत आहे. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी जेव्हा इंग्लंडचे सलामीवीर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आले तेव्हा खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर, चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रातही असेच काहीसे दिसून आले. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात, जेव्हा नाईट वॉचमन म्हणून आकाश दीप फलंदाजीसाठी आला, त्यावेळी चौथा दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक होती. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी आकाश दीपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सने आकाश दीपसोबत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. पण, आकाश दीपने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. 

नेमकं काय घडलं?, VIDEO:

भारताच्या दुसऱ्या डावातील 17 व्या षटकात, आकाश दीपला चेंडू टाकल्यानंतर, ब्रायडेन कार्स आला आणि रागाने काहीतरी म्हणाला. आकाश दीपनेही हाताने इशारा करत चल जा रे, बॉल टाक...असं म्हटलं. यानंतर, क्षेत्ररक्षण करणारा बेन स्टोक्स टाळ्या वाजवत केएल राहुलकडे आला आणि काहीतरी म्हणाला. दोघांमध्ये काही संवाद झाला. त्यानंतर चौथा दिवसातील शेवटचं षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स आला आणि त्याने चौथ्याच चेंडूवर आकाश दीपला बाद केले. त्यानंतर चौथा दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

यशस्वी जैस्वाल शून्यावर, तर शुभमन गिल सहा धावांवर बाद-

लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी फलंदाजी करणं फारच कठीण वाटत होतं. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला, तर करुण नायरने थोडा वेळ लढा देण्याचा प्रयत्न केला, पण 14 धावा करत पॅव्हिलियनमध्ये परतला. सलग दोन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल यावेळी फक्त 6 धावाच करू शकला. तर आकाश दीप 1 धाव करत बाद झाला.

संबंधित बातमी:

Eng vs Ind 3rd Test Day 4 Stumps : लॉर्ड्स कसोटीमध्ये रंजक ट्विस्ट, इंग्लंडचा जबरदस्त पलटवार! इतिहास रचण्यासाठी भारताला 135 धावांची गरज, राहुल-पंत-जडेजावर देशाच्या नजरा