R Ashwin Record in Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात पहिला कसोटी सामना (India vs Australia 1st Test) नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) सुरु असून सामन्याच्या पहिल्या डावात भारताने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे अनुभवी अष्टपैलू आर अश्विननं (R Ashwin) खास रेकॉर्ड नावावर केला आहे. अश्विननं सामन्यातील वैयक्तिक पहिला आणि संघाचा सहावा विकेट आर अश्विननं घेत इतिहास रचला आहे. त्यानं 450 कसोटी विकेट्स पूर्ण केले आहेत.






विशेष म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीनं विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 89 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली असून त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन याने 80 सामन्यांत हा रेकॉर्ड केला आहे. ज्यामुळे त्यानं शेन वॉर्नसारख्या (Shane Warne) दिग्गजांना मागे टाकलं आहे. याशिवाय भारताकडून अशी कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळेनंतर अश्विन दुसराच खेळाडू आहे. याशिवाय सर्वात कमी चेंडू फेकून ही कामगिरी करणाराही अश्विन दुसरा खेळाडू आहे. त्याने एकूोण 23 हजार 635 चेंडूंमध्ये ही कामगिरी केली असून त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राथने 23 हजार 474 चेंडूत ही कामगिरी केली होती.


टी ब्रेकपर्यंत भारत मजबूत स्थितीत


सामन्यात 60 षटकं पूर्ण झाली असून चहापाणाचा ब्रेक झाला आहे. दरम्यान या स्थितीत भारत मजबूत स्थितीत असून ऑस्ट्रेलियाची स्थिती 174 वर 8 बाद अशी आहे. तर सामन्याचा विचार केल्यास सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत टी ब्रेकपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे आठ गडी तंबूत परतवले. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने एकूण चार गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने दोन तर सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची सर्वाधिक खेळी केली.


हे देखील वाचा-