Chamika Karunaratne : भारताचा शेजारी देश श्रीलंकेत मागील बऱ्याच काळापासून मोठं आर्थिक संकट (Sri Lanka Financial Crisis) आलं असून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देश सोडल्यानंतर ही परिस्थिती आणखी चिघळली आहे. देशातील नागरिक रस्त्यावर उतरले असून नागरिकांना बऱ्यात अडणींचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेचा स्टार क्रिकेट चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) याला देखील गाडीत पेट्रोल भरण्याकरता तब्बल दोन दिवस लाईनमध्ये उभं राहावं लागल्याचं समोर आलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेला चमिकाने दिलेल्या माहितीत स्वत: याबाबत माहिती दिली. 


श्रीलंकेतील चिघळणाऱ्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा मोठा तुटवडा होत असून शाळा, कार्यालयं देखील बंद ठेवण्यात आली आहेत. ज्यामुळे नागरिकांना देखील पेट्रोल मिळणं अवघड झालं असून पेट्रोलची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आहे. या सर्व अडचणींपासून स्टार क्रिकेटर चमिका करुणारत्ने देखील वाचला नसून त्याला गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी तब्बल दोन दिवस लाईनमध्ये उभं राहवं लागलं आहे. याबाबत चमिका म्हणाला,''यंदा आशिया चषक तसंच इतरही मोठ्या क्रिकेटस्पर्धा पार पडणार आहेत. त्यामुळे सरावासाठी कोलंबो आणि इतरत्र जावं लागचं. त्यामुळे गाडीत पेट्रोल असणं गरजेचं आहे. पण मागील दोन दिवस मला पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागलं असून मी 10 हजार रुपयांचं पेट्रोल भरलं असून हे देखील जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसच उपयोगी येईल.''


पाहा व्हिडीओ - 






 


देशात राजकीय आणि आर्थिक संकट


दरम्यान श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटामुळे चिघळलेली ही परिस्थिती सर्वांसाठीच त्रास दायक असून नेमका यातून उपाय कधी निघेल हे सांगता येणार नाही. लेटेस्ट माहितीनुसार श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे. गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले. त्यामुळे आधीच बिघडलेली श्रीलंकेची आर्थिक आणि राजकीय घडी आता आणखीच विस्कटली आहे.


हे देखील वाचा-