Keshav Maharaj: क्रिकेटर्स हे अनेक वेळा मैदानातील खेळाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. आपल्या आवडत्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज (Keshav Maharaj) हा सध्या चर्चेत आहे. केशव महाराजनं गेल्या वर्षी लेरिशासोबत (Lerisha Keshav Maharaj) लग्नगाठ बांधली. केशव महाराज आणि लेरिशा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लेरिशा ही तिच्या सौंदर्यानं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. जाणून घेऊयात लेरिशाबद्दल...
लेरिशा आहे कथ्थक डान्सर
डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि त्याची पत्नी लेरिशा हे दोघेही भारतीय वंशाचे आहेत. केशव आणि त्याची पत्नी लेरिशा यांचे भारतात अनेक नातेवाईक आहेत. लेरिशा ही कथ्थक डान्सर आहे. लेरिशा तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
लेरिशा आणि केशव महाराजची लव्ह स्टोरी
केशव आणि लेरिशा यांची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे झाली.केशव आणि लेरिशा यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रिलेशनशिपमध्ये असूनही केशव आणि लेरिशा यांनी त्यांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगितलं नव्हते. नंतर केशव आणि लेरिशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
केशव महाराजने 2022 मध्ये लेरिशासोबत लग्नगाठ बांधली. केशव महाराजने त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, "देवाच्या, आमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या आशीर्वादाशिवाय आमची प्रेमकथा पूर्ण होणार नाही, आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस तुमच्या सर्वांसोबत शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे!"
लेरिशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती केशवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. लेरिशाला इन्स्टाग्रामवर 49.5K फॉलोवर्स आहेत. लेरिशा आणि केशव यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या: