SA vs AUS Semi Final LIVE:  रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आणि फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचा मुकाबला कोणत्या संघाशी होणार याचा फैसला आज कोलकात्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सामन्याला सुरुवात झाली. पण 12 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. सध्या पावसाने उसंत घेतली त्यामुळे सामन्याला सुरुवात झाली आहे.  पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला तर फायनलचं तिकिट कुणाला मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. 


डकवर्थ लुईस नियमांचाही विचार केल्यास... आफ्रिकेची 50 षटके फलंदाजी झाल्यानंतर पाऊस आला तर ऑस्ट्रेलियाला किमान 20 षटके फलंदाजी करावी लागेल. तेव्हाच डकवर्थ लुईस नियमांचा वापर होईल. 



दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झालाच नाही तर ?


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना (16 नोव्हेंबर ) कोलकाता येथे सुरु आहे. या सामन्यासाठीही आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. आज पावसामुळे सामना झाला नाही तर 17 तारखेला सामना खेळवण्यात येईल. पण 17 तारखेलाही पावसामुळे सामना झाला नाही तर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या संघाला फायनलचं तिकिट मिळणार आहे. 
 
दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांचे 14 - 14 गुण आहेत. पण आफ्रिकेचा रनरेट चांगला असल्यामुले ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर दुसरा सेमीफायनल सामना राखीव दिवशीही झाला नाही, तर दक्षिण आफ्रिकेला सेमीफायनलचे तिकिट मिळेल. 


आफ्रिका 4 बाद 44 -


कोलकाताच्या इडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. कॅप्टनसी सोडून दुसंर काहीच करू न शकलेला बवुमा स्वस्तात बाद झाल्यानंतर डाॅट बाॅलच्या प्रेशरमध्ये डिकाॅकही बाद झाला. त्यानंतर वॅन देर दसेन  आणि एडन मारक्रमही बाद झाला. त्यामुळे 12व्या षटकात 4 बाद 44 अशी स्थिती झाली. आफ्रिकेच्या इनिंगचा पहिला चौकार आठव्या षटकात आला.  हेनरिक क्लासेन आणि डेविड मिलर मैदानावर आहेत.


भारताचा फायनलमध्ये प्रवेश - 
न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने फायनलमध्ये पोहचली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सेमीफायनलचा सामना सुरु आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर आफ्रिकेला फायनलचं तिकिट मिळेल. पण सामना झाला तर जिंकणारा संघाला अहमदाबादचे तिकिट मिळणार आहे. 



साखळी सामन्यात काय झालं होतं?
विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये सुरु आहे. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियानं तिसरा क्रमांक पटकावला होता. पण उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता.