IND vs AUS, Indore Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 मालिकेतील (BGT 2023) तिसरी कसोटी भारतीय संघाने गमावली आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 गडी राखून पराभव केला. पाच दिवसांचा हा सामना 3 दिवसांच्या आतच संपला, असून भारतीय संघाकडून फलंदाजीमध्ये फारच खराब प्रदर्शन झालं.
दरम्यान या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या कसोटीतही खेळपट्टी फिरकीसाठी उपयुक्त बनवण्यात आली होती, जेणेकरून भारतीय संघाला फायदा मिळू शकेल, पण इथे मात्र बाजी उलटली. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहते विविध मीम्स शेअर करुन टीम इंडियाची मजा घेत आहेत. स्पिन फ्रेंडली विकेट बनवून टीम इंडिया स्वतःच्या जाळ्यात अडकल्याबद्दल मीम्स बनवले जात आहेत. यासोबतच या सामन्यात केएल राहुलला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवल्यानंतरही टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे. फनी मीम्सच्या माध्यमातून चाहते केएल राहुलला भारतीय संघाचा लकी चार्म म्हणत आहेत. तर या विविध मीम्समधील काही मीम्स पाहू...
भारताचा 9 विकेट्सने पराभव
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सर्वात आधी भारतानं नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडल्यावर पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत दुसऱ्या डावातही 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला ज्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावांची गरज कांगारुंना विजयासाठी होती. तिसऱ्या दिवशी पहिल्या षटका एक विकेट गमावल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेन आणि हेड यांनी स्फोटक फलंदाजी करत सहज विजय संघाला मिळवून दिला.
हे देखील वाचा-