1983 World Cup: भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं (Team India) 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं. 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं बलाढ्य संघ वेस्ट इंडीजचा (West Indies) पराभव करून लॉर्ड्समध्ये (Lords) तिरंगा फडकावला. भारतानं आजच्या दिवशी 39 वर्षापू्र्वी पहिल्यांदा विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या के. श्रीकांतनं (Krishnamachari Srikkanth) विश्वचषकामधील महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय. प्रशिक्षक नसल्यामुळं भारतानं विश्वचषक जिंकला, असंही विधान श्रीकांत यांनी केलंय. श्रीकांतचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 


श्रीकांत काय म्हणाले?
एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना म्हटलंय की, इंग्लंडमध्ये 1983 मध्ये खेळण्यात आलेल्या विश्वचषकात प्रशिक्षक नसल्याचा कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला खूप फायदा झाला. प्रशिक्षक नसल्यामुळं भारतीय संघावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हते.प्रशिक्षक हा अधिकाधिक रणनीतीकार असावा लागतो. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी आमच्याकडे प्रशिक्षक नव्हता. पीआर मान सिंह जे त्यावेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक होते, त्यांना क्रिकेटमधील काहीच समजत नव्हतं. याचा आम्हाला भरपूर फायदा मिळाला. प्रशिक्षक नसल्यानं संघावर दबाव नव्हता", असं श्रीकांतनं म्हटलंय. 


फिटनेसबाबत श्रीकांत यांची मोठी माहिती
"आम्ही कधीच व्यायाम केला नाही. मी आणि संदीप पाटील यांनी संपूर्ण आयुष्यात कधीही व्यायाम केला नाही. काही लोक चार फेऱ्या मारायचे. सय्यद किरमाणी थोडाफार व्यायाम करायचे. मी  गावस्कर यांनाही कधी व्यायाम करताना पाहिलं नाही. मी अजूनही सर्वात आळशी व्यक्ती आहे. मी 62 वर्षांचा आहे. आजही माझे आणि माझ्या पत्नीचे भांडण होते. ती म्हणते, 'जा व्यायाम करा, चालायला लागा'. मी नेहमीच म्हणतो की, मी नैसर्गिकरित्या फिट व्यक्ती आहे."


हे देखील वाचा-