Shubman Gill Golden Duck 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा 51 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 213 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर भारताचे दिग्गज फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आणि संपूर्ण संघ फक्त 162 धावांवर ऑलआऊट झाला.

Continues below advertisement

शुभमन गिलचा फॉर्म मोठी चिंता

टीम इंडियाची ओपनिंग जोडी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल आक्रमक सुरुवात करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि खातेही न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला. ज्यामुळे क्रिकेट चाहते संतापले. टी20 विश्वचषक जवळ आल्याने गिलचा सततचा खराब फॉर्म आता भारतीय संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंता बनला आहे.

Continues below advertisement

टी20 मधील पुनरागमनानंतर अजूनही मोठी खेळी नाही

आशिया कप 2025 साठी गिलची निवड झाल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले होते. त्यानंतर गिलने आपल्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा यशस्वी झाला नाहीत. 2025 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्याने आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत, पण एकदाही अर्धशतक ठोकले नाही. त्याची सर्वाधिक धावसंख्या 47 आहे, जी पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये आली होती. या 14 सामन्यांत गिलने केवळ 263 धावा केल्या आहेत.

वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची वाढती डोकेदुखी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध आणखी 5 टी20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर लगेच टी20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. अशात गिलचा निराशाजनक फॉर्म टीम इंडियासाठी मोठे संकट ठरू शकतो. भारतीय संघाकडे संजू सॅमसन हा पर्याय उपलब्ध आहे. गिलच्या पुनरागमनापूर्वी अभिषेक शर्मासोबत संजू नियमितपणे ओपनिंग करत होता. पण गिल संघात आल्यापासून संजूला अंतिम 11 मध्येही स्थान मिळत नाही.

संजू सॅमसनचा फॉर्म, तरीही बाहेर 

माध्यमांमध्ये अनेकदा बातम्या आल्या आहेत की गिल, संजू सॅमसनची जागा वापरत आहे. आणि आकडेवारी पाहिली तर संजू सॅमसनचा फॉर्म गिलपेक्षा खूपच सरस आहे. गेल्या एका वर्षात संजूने तीन टी20 शतके झळकावली आहेत. त्याशिवाय तीन अर्धशतकेही केली आहेत. तरीसुद्धा ते संघाबाहेर आहेत आणि गिलला वारंवार संधी मिळत आहे. टी20 वर्ल्ड कप अगदी तोंडावर असताना शुभमन गिलचा खराब फॉर्म आणि संजू सॅमसनसारख्या इन-फॉर्म खेळाडूला बाहेर बसवणे, ही दोन्ही परिस्थिती टीम इंडियासाठी मोठा प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

हे ही वाचा -

Suryakumar Yadav Ind vs Sa 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर सूर्यकुमार यादव भडकला, शुभमन गिलचं नाव घेत नको ते बोलला, कोणाला धरले जबाबदार?