IND vs SA, 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने 9 धावांनी गमावला, ज्यानंतर आता मालिकेतील आव्हान जिवंत ठेण्यासाठी भारत दुसरा सामना खेळणार आहे. मालिकेतील दुसरा सामना रांची येथे रविवारी (9 ऑक्टोबर) पार पडणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडीया रांची येथे पोहोचली असून तेथील सुदंर वातावरणात भारतीय स्टार बरेच फोटो काढत आहे. शुभमननेही त्याच्या ट्वीटर तीन फोटो शेअर केले आहेत. यात तो, ईशान किशन आण शिखर धवन यांच्यासोबत निवांत मूडमध्ये दिसत आहे.


पाहा फोटो-



पहिल्या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करुनही फलंदाज फेल झाल्याचं पाहायला मिळालं. केवळ श्रेयस अय्यरनं अर्धशतक ठोकलं तर संजू सॅमसननं नाबाद 86 धावा ठोकत अखेरपर्यंत झुंज दिली खरी पण तो सामना जिंकवू शकला नाही. अशामध्ये आता दुसरा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. भारताने सामना जिंकला तरच मालिकेतील आव्हान जिवंत राहील. तर दक्षिण आफ्रिका जिंकल्यास ते मालिकेत विजयी आघाडी घेतली. तर या सामन्यापूर्वी माईंड फ्रेश करण्यासाठी खेळाडू चिल करत आहेत.





पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत पराभूत


पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 40 ओव्हर्सचा करण्यात आला. त्यानंतर मॅचमध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. सुरुवातीला भारताने चांगली गोलंदाजी केली. पण दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकने 48 धावांची चांगली खेळी केली. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या दोघांनी अनुक्रमे नाबाद 74 आणि नाबाद 75 धावा करत 249 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर 250 धावा 40 षटकांत कऱण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली.सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकत डाव सावरला. तो 50 रन करुन आऊट झाला. दुसऱ्या बाजूने संजूने डाव सावरला होता. शार्दूलनेही 33 धावांची महत्त्वपूर्ण साथ संजूला दिली. पण त्यानंतरही भारत 40 षटकांत 240 धावांच करु शकल्याने सामना 9 धावांनी भारताने गमावला.  





हे देखील वाचा-