India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात पहिला कसोटी सामना नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सुरु झाला असून नाणेफेकीचा कौल आज ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादव आणि केएस भरत या दोघांनी संघात पदार्पण केलं आहे. बऱ्याच काळापासून सूर्याच्या पदार्पणाची चाहते वाट पाहत होते. जे अखेर पार पडलं आहे. पण सोबतच कमाल फॉर्मात असणाऱ्या शुभमन गिलला मात्र संघात संधी मिळालेली नाही. केएल राहुल पुन्हा एकदा संघात परतला असून तोच रोहितसोबत सलामीला येणार हे निश्चित झालं आहे. विराच, पुजारा हे मधल्या फळी असून अश्विन, जाडेजा आणि अक्षर हे अष्टपैलू संघात आहेत. तर शमी आणि सिराज वेगवान गोलंदाजीचा अटॅक सांभाळणार आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुखापतीमुंळ स्टार्क, हेझलवुड, ग्रीन या स्टार खेळाडूंशिवाय मैदानात उतरावं लागलं आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 120 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 30 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. दरम्यान एकीकडे भारतीय संघाने वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर न्यूझीलंडलाही एकदिवसीय आणि त्यानंतर टी20 मालिकेत भारतानं विजय मिळवला. पण आता भारताची खरी परीक्षा असणार आहे.
हे देखील वाचा-