IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यात आता कसोटी मालिका सुरु असून पहिल्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत असून भारतीय संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. श्रेयसला बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच नागपूर कसोटीत दुखापतीमुळे खेळता आले नाही, पण आता श्रेयस अय्यर दिल्लीत 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने श्रेयस अय्यरबद्दल इनसाइड स्पोर्ट्सला माहिती दिली आहे, "श्रेयसची रिकव्हरी खूप चांगली होत आहे. त्याने मैदानी प्रशिक्षण सुरू देखील केले आहे. तो या आठवड्यात नेटवर परतणार आहे. तो दिल्लीत संघासोबत सामील होण्याची अपेक्षा आहे." पण सर्व त्याच्या फिटनेस चाचणीवर अवलंबून असेल.






 


पाचव्या क्रमांकासाठीच्या शर्यतीत श्रेयस


श्रेयस दुखापत होण्यापूर्वी संघात एक प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याने 2022 मध्ये भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा केल्या, परंतु त्याची दुखापत आणि ऋषभ पंतच्या अपघातामुळे संघ व्यवस्थापनाला नवीन रणनीती आखण्यास भाग पाडलं. श्रेयस पाचव्या नंबरसाठी शर्यतीत आहे. दरम्यान श्रेयस फिट झाल्यास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. श्रेयस अय्यर अधिकतर कसोटी फॉर्मेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाने नागपूर कसोटीत पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी दिली आहे. आता दुसऱ्या कसोटीत कोणाला विश्रांती मिळेल आणि कोण संघात हे पाहावे लागेल.


कॅप्टनकडे अनेक पर्याय  


त्याचबरोबर केएल राहुलला उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या शुभमन गिलला वगळून प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. मात्र, केएल राहुललाही पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते, असे काही क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय ईशान किशनही आहे, जो ऋषभ पंतच्या शैलीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याकडे 4-4 पर्याय उपलब्ध असतील. त्यामुळे आता श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त झाला तर टीम इंडिया कोणत्या प्लेईंग कॉम्बिनेशनसह मैदानात उतरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


हे देखील वाचा-