Shreyas Iyer : दुखापतीवर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या श्रेयस अय्यर याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. श्रेयस अय्यर आर्थिक मदत करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचे समजतेय. हा व्हिडीओ दोन आठवडे जुना आहे. दरम्यान, श्रेयस अय्यर बंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. 


श्रेयस अय्यर याचा मदत करतानाचा व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. नेटकऱ्यांनी श्रेयस अय्यर याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. श्रेयस अय्यर प्रॅक्टिसनंतर आपल्या गाडीतून निघाला होता. त्याचवेळी बाप पोराला कडेवर घेऊन श्रेयस अय्यर याच्या गाडीजवळ आला. त्याने श्रेयस अय्यर याच्याकडे मदतीची मागणी केली. त्यावेळी श्रेयस अय्यर याने हसत हसत बाळाची विचारपूस केली. अय्यरला पाहिल्यानंतर तिथे आणखी एकजण आला. श्रेयस अय्यर याने आपल्या खिशातून पैसे काढून त्या दोन्ही व्यक्तींना मदत केल्याचे व्हिडीओत दिसतेय. श्रेयस अय्यर याने त्या दोघांना आपल्याकडील काही रक्कम मदत म्हणून दिली. 


श्रेयस अय्यर याच्या गाडीजवळ मुलाला घेऊन बाप पैसे मागत असल्याचे दिसतेय. त्यावेळी अय्यर याने चौकशी करत त्यांना मदत केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जातोय. श्रेयस अय्यर भावा तू मन जिंकलेस... अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. अल्पवधीतच हा व्हिडीओ चर्चेचा विषय झालाय. 










दुखापतीमुळे श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर आहे. अय्यर याच्यावर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे. दुखापतीमुळे अय्यर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकला होता. आता पुनरागमनासाठी तो सज्ज झालाय. मंगळवारी एनसीएमध्ये झालेल्या सराव सामन्यात अय्यर याने भाग घेतला होता. 


श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या दुखापतीने भारतीय संघाची आणि चाहत्यांची चिंता वाढली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपलाही दोघे मुकले होते. आता आगामी विश्वचषक आणि आशिया चषकात अय्यर खेळणार का? असा सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येत होता. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यर जवळपास पूर्णपणे फिट झालाय. आज त्याने बेंगलोरमधील एनसीएमध्ये सराव सामन्यात सहभाग घेतला होता. फलंदाजी आणि फिल्डिंग करताना दिसलाय. श्रेयस अय्यर फिल्डिंग करतानाचा आणि फलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.