BCCI on Shreyas Iyer Health Update : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सिडनीतील (Sydney) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) गंभीर दुखापत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे, रिपोर्ट्स आल्यानंतर अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले आणि त्याला तातडीने दाखल करावे लागले. झेल घेताना श्रेयसच्या बरगड्यांना मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला, त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुखापतीमुळे श्रेयसचे आगामी काही सामन्यांमध्ये खेळणे अनिश्चित मानले जात आहे.

Continues below advertisement

अय्यरच्या दुखापतीबाबत सुरुवातीला अशी बातमी आली होती की, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की अय्यरवर कोणतीही सर्जरी करण्यात आलेली नाही. डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील अंतर्गत रक्तस्त्राव (internal bleeding) एका वेगळ्या उपचार पद्धतीने थांबवला आहे.

श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय (Shreyas Iyer Health Update News)

Continues below advertisement

देवजीत सैकिया यांनी सांगितले, “श्रेयस अय्यर आता पूर्वीपेक्षा खूप चांगल्या स्थितीत आहे. त्याची तब्येत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे, हे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “मी सतत टीम इंडियाचे डॉक्टर डॉ. रिजवान यांच्या संपर्कात आहे. ते सिडनीत अय्यरसोबत रुग्णालयात थांबले आहेत. साधारणपणे अशा प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यास 6 ते 8 आठवडे लागतात, पण श्रेयस त्यापूर्वीच पूर्णपणे बरा होईल.” सैकिया यांनी आणखी माहिती दिली की, “डॉक्टर अय्यरच्या प्रकृतीबाबत समाधानी आहेत. त्याने दैनंदिन कामं पुन्हा सुरू केली आहेत. दुखापत गंभीर होती, पण आता श्रेयस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळेच त्याला ICU मधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे.”

सिडनीत सामना खेळताना झाली होती दुखापत (How did Shreyas Iyer get injured?)

सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. झेल घेतल्यानंतर तो वेदनेत तडफडताना दिसला आणि त्याला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती आणि त्यात अंतर्गत रक्तस्त्रावही झाला होता. सध्याच्या ताज्या अपडेटनुसार, श्रेयस अय्यर आता पूर्णपणे सुरक्षित असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus 1st T20 Playing XI: बुमराह, चक्रवर्ती IN, कुलदीप, रिंकू OUT...; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI