नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टी 20 मॅच बुधवारी 29 ऑक्टोबरला होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडिया वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं आशिया कप जिंकला होता. आता भारताकडे ऑस्ट्रेलिया त्यांच्या घरात पराभव करण्याची संधी आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं पहिल्या टी 20 मॅचसाठी प्लेईंग 11 निवडली आहे. आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इरफान पठाणनं संघाबाहेर ठेवलं.

Continues below advertisement

इरफान पठाण यानं शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांना सलामीवीर म्हणून संधी दिली आहे. तर, तिसऱ्या स्थानावर कॅप्टन सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात येईल. सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जातीय. चौथ्या स्थानावर तिलक वर्मा फलंदाजीला येईल. तिलक वर्मानं आशिया कपच्या फायनलमध्ये नाबाद 69 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता.  

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेत हार्दिक पांड्या नसल्यानं संजू सॅमसनला पाचव्या स्थानावर फलंदाज म्हणून इरफान पठाणनं संधी दिली. शिवम दुबे सहाव्या स्थानावर तर अक्षर पटेल स्पिनर ऑलराऊंडर म्हणून इरफान पठाणनं संधी दिली आहे.  

Continues below advertisement

Harshit Rana : हर्षित राणावर विश्वास ठेवला

इरफान पठाणच्या मते सिडनी वनडेमध्ये 4 विकेट घेत हर्षित राणानं टी 20 मधील प्लेईंग इलेव्हनमधील जागेवर दावा ठोकला आहे. हर्षित राणानं एडिलेड वनडेत 24 धावांची खेळी केली. तर, दुसरा स्पिन गोलंदाज म्हणून वरुण चक्रवर्तीला इरफान पठाणनं पसंती दिली.  कुलदीप यादवनं आशिया कपमध्ये 17 विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.  

भारताच्या वेगवान माऱ्याचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराह याच्याकडे दिलं आहे. जसप्रीत बुमराह सोबत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा वेगवान गोलंदाजीसाठी असतील. इरफान पठाण याची प्लेईंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती

भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर