ICC Champions Trophy 2025 India vs Pakistan : 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरूही झालेली नाही आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) दोन्ही अंतिम संघांची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण आठ संघ सहभागी होतील. ज्यांना दोन गटात विभागण्यात आले आहे. या 19 दिवसांच्या स्पर्धेत टीम इंडियाचा दुसरा सामना यजमान पाकिस्तानविरुद्ध आहे. 23 फेब्रुवारी रोजी संघासोबत सामना खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी शोएब अख्तरने अंतिम फेरीसाठी कोणत्या दोन संघांचे भाकीत केले आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये कोणते दोन संघ खेळतील?


चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पीटीव्ही स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघ निश्चितच सेमीफायनल खेळतील. यासोबतच अंतिम सामन्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हे दोन्ही संघ अंतिम फेरीतही पोहोचू शकतात. शोएब अख्तरचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानी संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार आहेत.






2017 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पाकिस्तानने जिंकले होते. पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे. त्याच वेळी 2017 पूर्वी खेळलेली चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाने जिंकली होती. ज्यामध्ये टीम इंडियाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीने केले होते.


चॅम्पियन्स ट्रॉफी हे टीम इंडियासाठी मोठे आव्हान 


यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर असेल. टीम इंडिया नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतली आहे, जिथे संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे टीम इंडियासाठी खूप महत्वाचे असेल, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी हे काम सोपे असणार नाही.


हे ही वाचा - 


Delhi vs Railways Ranji Match : विराट कोहलीचा रणजी सामना केव्हा, कुठे अन् किती वाजता होणार सुरू? फुकटात मॅच कुठे बघायची... जाणून घ्या A टू Z एका क्लिकवर