Shashi Tharoor On Suryakumar Yadav : टी 20 मधील अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादव याला ऑस्ट्रेलियाविरोधात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. तीन सामन्यात सूर्यकुमारला एकही धाव काढता आली नाही. तिन्ही वेळा सूर्या गोल्डन डक झाला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका टिपण्णी करण्यात येत आहे. काही जण मिम्स करत ट्रोल करत आहेत. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही आता सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोवर ताशेरे ओढले आहेत. तसेच संघात जागा मिळवण्यासाठी संजू सॅमसनला काय करावे लागेल? असा सवाल उपस्थित केला आहे. 


सूर्यकुमार फ्लॉप झाल्यानंतर सोशल मीडियावर संजू सॅमसनच्या चाहत्यांनी रोहित शर्मा आणि टीम इंडियावर टीका केली. त्याशिवाय अनेक मिम्स पोस्ट करण्यात आले. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. प्रतिभावंत खेळाडू संजू सॅमसन याला आणखी किती दिवस संघातून बाहेर ठेवले जाईल? संघात स्थान मिळवण्यासाठी संजू सॅमसनला काय करावे लागेल? असा सवाल थरुर यांनी उपस्थित केला आहे. 


थरुर यांनी आपल्या ट्वीटमध्ये टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात की, लागोपाठ तीन वेळा गोल्डन डक होत सूर्यकुमार यादव याने अविश्वसनीय विश्व रिकॉर्ड केला आहे. पण वनडे क्रिकेटमध्ये 66 च्या सरासरीने धावा करणाऱ्या संजू सॅमसन टीम बाहेर का आहे. संजू सॅमसन याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे योग्य आहे. .. तरीही त्याने धावा केल्या. त्यानंतरही संजू टीममध्ये नाही. संघात स्थान मिळवण्यासाठी संजूला आणखी काय करण्याची गरज आहे?


पाहा शशी थरुर यांचे ट्वीट - 






शशी थरुर यांच्याशिवाय सोशल मीडियावर अनेकांनी सुर्याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संजू सॅमसन याला संघात स्थान द्यायला हवे, अशी मागणी केली आहे. टीम इंडिया काय करते? याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


सूर्याचा फ्लॉप शो - 


ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव याने खराब कामगिरी केली. तिन्ही सामन्यात तो गोल्डन डकचा शिकार झाला. तिसऱ्या वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया मजबूत स्थितीत होती. विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला.. पण एकही धाव न काढता माघारी परतला.. त्यामुळे टीम इंडियावर दबाव वाढला. तसेच ऑस्ट्रेलिया सामन्यात मजबूत स्थितीत गेला. परिणामी टीम इंडियाला 21 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह टीम इंडियाला मालिकाही गमावावी लागली. टीम इंडियाच्या पराभवाला अनेकांनी सूर्यकुमार यादवची खराब फलंदाजी जबाबदार असल्याचे म्हटलेय.