IND vs AUS, 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला विशाखापट्टणमच्या मैदानात सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. पहिल्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी निवडून विजय मिळवला होता. आज ऑस्ट्रेलियाही तशीच रणनीती आखत असून भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य लवकरात लवकर पार करण्या त्यांचा डाव आहे. दरम्यान भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा परतल्यामुळे संघात काही बदल झाले असून ऑस्ट्रेलियानेही दोन बदलांसह संघ मैदानात उतरवला आहे.
तर सर्वात आधी म्हणजे रोहित शर्मा संघात परतल्यामुळे तो सलामीला येणार असून ईशान किशन विश्रांतीवर आहे.याशिवाय पहिल्या सामन्यात काही खास कामगिरी करु न शकल्याने शार्दूल ठाकूरही (Shardul Thakur) पुन्हा बेंचवर असून दमदार फॉर्मात असणारा अक्षर पटेल पुन्हा संघात आला आहे. त्यामुळे अक्षर, जाडेजा आणि कुलदीप अशा तीन स्पीनरसह भारत मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्येही दोन बदल असून इन्गिसच्या जागी अॅलेक्स कॅरी परतला असून नॅथन एलिस मॅक्सवेलच्या जागी खेळत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
पिच रिपोर्ट काय म्हणतोय?
सामना होणाऱ्या विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. या स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 241 आहे, जी दुसऱ्या डावात 211 पर्यंत खाली घसरते. खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी चांगली असली तरी स्लो गोलंदाजी करणाऱ्यांना देखील मदत करते. पण आज पावसाची शक्यता असल्याने परिस्थिती वेगळी असू शकते. वेगवान गोलंदाजांना देखील फायदा मिळू शकतो. तसंच या ठिकाणी खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी 9 संघाने पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे जो कोणी संघ नाणेफेक जिंकतो, त्याला कदाचित या रेकॉर्डवर टिकून राहावेसे वाटेल आणि प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-