MI Emirates New Head Coach: मुंबई इंडियन्सच्या मालिकीच्या एमआय एमिरेट्सच्या संघानं त्यांच्या कोचिंग स्टाफची घोषणा केलीय. एमआय इमिरेट्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू शेन बॉन्डची (Shane Bond) नियुक्ती करण्यात आलीय. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल (Parthiv Patel) एमआय एमिरेट्स संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावेल. या व्यतिरिक्त विनय कुमार (Vinay Kumar), जेम्स फ्रँकलिन (James Franklin) आणि रॉबिन सिंह उथप्पा (Robin Uthappa) यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय.
ट्वीट-
यूएई टी-20 लीग कधी खेळवली जाणार?
आंतरराष्ट्रीय टी-20 लीग पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप या लीगबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा शेड्युल समोर आलेलं नाही. परंतु, असा अंदाज लावला जातोय की दक्षिण आफ्रिका टी-20 लीग आणि यूएई टी-20 सोबत खेळल्या जाऊ शकतात. दक्षिण आफ्रिका टी-20 लीग जानेवारी ते मार्च महिन्यात आयोजित केली जाणार आहे. याचदरम्यान, पाकिस्तान प्रिमिअर लीग देखील खेळली जाणार आहे.
शेन बॉन्डची प्रतिक्रिया
न्यूझीलंडचा माजी गोलंदाज शेन बॉन्ड हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कामगिरी पाहत होते. मुंबईच्या इंडियन्सच्या एमआय एमिरेट्सच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर शेन बॉन्डनं म्हणाला की, एक नवीन संघ बनवणं खूप उस्ताहजनक असतं. मी मुंबईच्या इंडियन्सचा वारसा पुढे घेऊन जाण्यात आणि संघाला यशाच्या उंचीवर घेऊन जाण्यास खेळाडूंना प्रोत्साहित करेल."
महिला जयवर्धनेची मुंबईच्या हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्ती
मुंबई इंडियन्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धनेनं मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलाय. मुंबई इंडियन्सच्या संघानं त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवल्यानं महिला जयवर्धनेनं हा निर्णय घेतलाय. महिला जयवर्धनेंची हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्ती करण्यात आलीय. यापुढं जयवर्धनें मुंबई फ्रँचायझीच्या 3 संघांच्या प्रदर्शनाला सुधारण्याचे काम पाहतील.
जहीर खान यांच्यावरही मोठी जबाबदारी
महिला जयवर्धने यांच्याव्यतिरिक्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्यावरही मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. जो खेळाडूंच्या विकासासाठी जबाबदार असेल. याशिवाय, खेळाडूंची प्रतिभा ओळखणं आणि एमआयसाठी एक मजबूत संघ तयार करणे, यासाठी जहीर खान काम करेल. झहीरची ही भूमिका जगभरातील एमआयच्या संघांना मदत करण्यात महत्त्वाची ठरेल.
हे देखील वाचा-