LLC 2022, India capitals vs Gujrat Giants : लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) दुसऱ्या हंगामाला आता सुरुवात झाली असून आज (17 सप्टेंबर) इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) हे दोन संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघाचं नेतृत्त्व करणारे माजी दिग्गज क्रिकेटर हे दिल्लीकर आहेत. यावेळी इंडिया कॅपिटल्सचं नेतृत्त्व वीरेंद्र सेहवाग करणार असून गुजरात जायंट्सची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हे दोन्ही दिग्गज आता आमने-सामने जगभरातील माजी दिग्गज खेळाडूंची फौज घेऊन उतरणार असल्याने एक अटीतटीचा आणि फुल-ऑन एन्टरटेनिंग सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे.


कधी, कुठं पाहायचा सामना?


लीजेंड्स लीग क्रिकेटचा आजचा सामना (17 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. 


कसे आहे दोन्ही संघ?


इंडिया कॅपिटल्स :


गौतम गंभीर (कर्णधार), जॅक कॅलिस, रजत भाटिया, दिशांत याग्निक, सुहेल शर्मा, मिचेल जॉनसन, जॉन मूनी, हेमिल्टन मसाकात्जा, फरवीज महारूफ, रवी बोपारा, रॉस टेलर, लिया प्लंकेट, दिनेश रामदीन, पंकज सिंह, सोलोमन मीर, एश्ले नर्स, असगर अफगान, प्रवीण तांबे.


गुजरात जायंट्स:


वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), डॅनियल व्हेटोरी, ग्रीम स्वॅन, तिलकरत्ने दिलशान, ख्रिस गेल, पार्थिव पटेल, मनविंदर बिस्ला, एल्टन चिगंबुरा, जोगिंदर शर्मा, यशपाल सिंह, रयाद एमरित, केविन ओब्रायन, रिचर्ड लेवी, अशोक डिंडा, थिसारा परेरा, अजंता मेंडिस, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लाघन.


सलामीचा खास सामना इंडिया महाराजाने जिंकला


लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) सामन्यांना आज सुरुवात होत असली तरी शुक्रवारी (16 सप्टेंबर) एक खास सामना पार पडला. यावेळी जगभरातील माजी दिग्गज खेळाडू आणि भारताचे माजी दिग्गज खेळाडू आमने-सामने आले होते.  इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात पार पडलेल्या या सामन्यात इंडिया महाराजाने 6 गडी राखून विजय मिळवला. यावेळी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर तसंच जगभरातील निवडक माजी दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरल्याचे दिसून आलं. सामन्यात भारताचे माजी क्रिकेचर युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी नाबाद खेळी केली तर पंकज सिंहने 5 विकेट्स घेत कमाल केली. 


हे देखील वाचा-