Shakib Al Hasan in Bangladesh Premier League : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) मैदानावर अनेकदा पंचासोबत वाद घालताना दिसला आहे. कधी तो खेळाडूशी बाचाबाची करताना दिसतो तर कधी तो पंचांशी भांडताना दिसतो. आताही असेच काहीसे घडले आहे. बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान, दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी शाकिबता पंचांशी बराच वेळ वाद झाला. या वादामुळे तीन मिनिटांपर्यंत सामना थांबला होता.


रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्युन बारिशाल या संघाच्या सामन्यादरम्यान ही घटना पाहायला मिळाली. शाकिब बारिशाल संघाचा कर्णधार आहे. या सामन्यात रंगपूरने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या. इकडे बारिशालचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा चेंडू टाकण्यापूर्वी स्ट्राईक कोण घेणार यावरून पंच आणि शाकीब गोंधळले. ज्यातूनच पुढे वादही झाला


दुसऱ्या डावात चतुरंगा डी सिल्वा स्ट्राईक घेत होता, तेव्हा शाकिबने बाऊंड्री लाईनवर उभे राहून अनामूल हकला स्ट्राईक घेण्यास सांगितले. सुरुवातीला तो सीमारेषेवर उभा राहून हातवारे करत राहिला, पण जेव्हा काही जमले नाही तेव्हा तो मैदानात उतरला. येथे अंपायरने त्याला नियम समजावून सांगितले आणि केवळ डिसिल्व्हाच स्ट्राईक घेणार असल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान रंगपूर रायडर्सच्या खेळाडूंनीही शाकिबच्या या वागणुकीची पंचांकडे तक्रार केली. यादरम्यान सुमारे 3 मिनिटं खेळ थांबला होता.


पाहा व्हिडीओ-






दोन दिवसांपूर्वीही झाला होता वाद


बांगलादेश प्रिमीयरमधील सामन्यातच दोन दिवसांपूर्वी अंपायरने वाईड बॉल न दिल्याने शाकिब अल हसन नाराज झाला होता. त्यादरम्यान अंपायर आणि शाकिबमध्ये बराच वेळ वादावादीही झाली. त्या सामन्यात शाकिबच्या बारीशाल संघाचा विजय झाला होता. चुरशीचा सामना अखेर फॉर्च्युन बारीशालच्या बाजूने गेला,  इब्राहिम झद्रान आणि मेहदी हसन यांच्या खेळीच्या बळावर बारिशालने 4 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले होते.


हे देखील वाचा-