India vs South Africa 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. रांची (Ranchi) जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स (JSCA International Stadium Complex) येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला मालिकेत आव्हान टीकवून ठेवण्यासाठी विजय मिळवणं आवश्यक आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात दोन्ही संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. दरम्यान, शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारताचा युवा स्टार ऑलराऊंडर शाहबाज अहमदनं (Shahbaz Ahmed) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. यानंतर शाहबाज अहमद आहे तरी कोण? अशा चर्चा सुरू झाल्या. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शाहबाज अहमदनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. ऑलराऊंडर शाहबाज अहमद एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 247वा भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या मागच्या हंगमात शाहबाजनं चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.


शाहबाज अहमद कोण आहे?
शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय ए संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे. शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे. शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे. एवढेच नव्हे तर, त्यानं आयपीएलमध्येही 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.


द.आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.


हे देखील वाचा-