South Africa tour of India: भारत आण दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. रांचीच्या (Ranchi) जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे (JSCA International Stadium Complex) खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आजारी असल्यामुळं त्याला विश्रांती देण्यात आलीय. त्याच्या जागी केशव महाराज (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व करेल. 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघात बदल करण्यात आलाय. ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोईला बाहेर बसवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. शाहबाज अहमद त्याच्या कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघात कर्णधार टेंबा बावुमा नाही आणि तबरेझ शम्सीही आजारी असल्यामुळं त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांचा संघात समावेश करण्यात आलाय.


हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 88 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतानं 35 सामने जिंकले आहेत. तर, आफ्रिकानं 50 सामने जिंकले आहेत. यातील 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतानं घरच्या मैदानावर 10 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या घरच्या मैदानावर 25 सामने जिंकले आहेत आणि 14 भारतात जिंकले आहेत. 


दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन


भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर.


दक्षिण आफ्रिका संघ:
जनेमान मलान, क्विंटन डी कॉक, केशव महाराज (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरीक क्लासेन, डेविड मिलर, वेन पारनेल, एनरिक नॉर्टेजे, कागिसो रबाडा आणि ब्योर्न फॉर्च्युइन 


हे देखील वाचा-