IND vs AUS T20 Series : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत (India vs Australia) यांच्यात उद्यापासून (20 सप्टेंबर) T20 मालिका रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा टी20 कर्णधार आरॉन फिंच (Aaron Finch) याने व्हर्च्युवल प्रेस कॉन्फरन्समध्ये विराट कोहली (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं. कोहलीनं मागील 15 वर्षात दाखवलं आहे की तो एक महान खेळाडू आहे, असं फिंच म्हणाला आहे.
विराटबद्दल बोलताना फिंच म्हणाला,"विराट कोहली याने आतापर्यंत केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर मागील 15 वर्षांत तो एक माहन खेळाडू आहे, हे सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे टी20 क्रिकेट प्रकारात त्याने खेळाला एका मोठ्या उंचीवर पोहोचवलं आहे. आता त्याचा सामना करण्यासाठी आम्हाला सर्वश्रेष्ठ तयारी करणं गरजेचं आहे. त्याने आजवर 71 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली असून हे करणं सोपं नाही."
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.
ऑस्ट्रेलिया संघ
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20/09/2022 | ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम |
दुसरा टी-20 सामना | 23/09/2022 | विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र |
तिसरा टी-20 सामना | 25/09/2022 | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद |
कधी होणार सामने?
हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान नाणेफेक ही 7 वाजता होणार आहे.
कुठे पाहता येणार सामने?
या तिन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर केले जाणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग Disney+Hotstar Plus या अॅपवर पाहता येणार आहे.
हे देखील वाचा-