Sarfaraz Khan : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या सरफराज खानच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. त्याची पत्नी रोमना जहूर हिने सोमवारी (दि.21) सोमवारी रात्री एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. सरफराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सरफराजची पत्नी स्टेडियममध्ये उपस्थित राहात सपोर्ट करताना दिसली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराजची दमदार कामगिरी
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सरफराज खानने शानदार फलंदाजी केली होती. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्फराज खान सपशेल अपयशी ठरला होता. त्याने 3 चेंडूंचा सामना केला आणि त्याला एकही धाव करता आली नाही. मात्र, दुसऱ्या डावात त्याने शानदार खेळी केली. सरफराजने 195 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 3 षटकारही मारले. मात्र, भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
सरफराजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला याच वर्षी सुरुवात
सरफराज खानसाठी हे वर्ष खूप चांगले होते आणि महत्तपूर्णही ठरले. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सरफराजने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळला होता. या कसोटीच्या पहिल्या डावात तो धावबाद झाला. त्याने 66 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावात 68 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या