Sarfaraz Khan Suryakumar Yadav : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) नशिबाचं दार उघडलं. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी (Sarfaraz Khan IND vs ENG 2nd Test) सरफराज खानला टीम इंडियात संधी मिळाली. सरफराज खान याला टीम इंडियात (IND vs ENG 2nd Test) स्थान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून संघनिवडीवेळी सरफराज खानच्या नावाची चर्चा होत होती, पण त्याला स्थान मिळत नव्हते.  केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला अन् सरफराज खान याला टीम इंडियाचं तिकिट मिळालं. त्यानंतर आजी-माजी क्रिकेटरने त्याला शुभेच्छा दिल्या. मुंबईकर सूर्यकुमार यादव यानेही सरफराज खान याला शुभेच्छा देताना सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सूर्यकुमार यादवची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. 


काय म्हणाला सूर्यकुमार यादव ?


सूर्याने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये सरफराज खान याला शुभेच्छा दिल्या आहेत. सूर्याने दोघांचा फोटो पोस्ट करत लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. सूर्याने आपल्या पोस्टमध्ये  "उत्सव की तैयारी करो." असे म्हटलेय. सूर्याची ही पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्चा वर्षाव होतोय. 


टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठीही सूर्याला खूप वर्षे वाट पाहावी लागली होती. तशीच काहीशी स्थिती सरफराज खान याच्यासोबत झाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही दिवसांपासून सरफराज खान याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत, पण त्याला टीम इंडियात स्थान मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. सरफराज आणि सूर्या यांना अनेक वर्षांच्या संघर्षानंतर टीम इंडियात स्थान मिळालेय. सरफराज आणि सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा भाग आहेत. त्यामुळे सरफराज खान याच्या निवडीनंतर सूर्याने मन जिंकणारी पोस्ट केली आहे. 





विशाखापट्टणम कसोटीत सरफराज खान पदार्पण करू शकतो का?


हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला 28 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडचा संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. सरफराज खान इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत पदार्पण करू शकतो, असे मानले जात आहे.


इंग्लंड लायन्सविरुद्ध शतक ठोकले


अलीकडेच भारत-अ संघाकडून खेळताना सरफराज खानने इंग्लंड लायन्सविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली होती. सर्फराज खानने इंग्लंड लायन्सविरुद्ध 161 धावांची इनिंग खेळली होती. मात्र याशिवाय सरफराज खानचा विक्रमही उत्कृष्ट ठरला आहे. 44 प्रथम श्रेणी सामन्यांशिवाय सरफराज खानने 37 लिस्ट-ए आणि 96 टी-20 सामने खेळले आहेत. सरफराज खानने आयपीएलमध्ये 50 सामने खेळले आहेत.


सर्फराज खानची कारकीर्द 


सरफराज खानने 44 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 68.2 च्या सरासरीने आणि 69.6 च्या स्ट्राईक रेटने 3751 धावा केल्या आहेत. तर 37 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 34.9 च्या सरासरीने आणि 94.2 च्या स्ट्राईक रेटने 629 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 96 टी-20 सामन्यांमध्ये 22.4 च्या सरासरीने आणि 128.3 च्या स्ट्राइक रेटने 1188 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या 50 सामन्यांमध्ये 22.5 च्या सरासरीने आणि 130.6 च्या स्ट्राइक रेटने 585 धावा केल्या आहेत.


दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत  (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार) , मुकेश कुमार, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर, सौरभ कुमार


आणखी वाचा : 


मोठी बातमी! दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जाडेजा अन् केएल राहुल संघाबाहेर, सरफराज खानसह 3 जणांना संधी 


Sarfaraz Khan : सरफराज खानची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री! देशांतर्गत घाम गाळल्यानं नशीबाचं दार अखेर उघडलं