Bhuvneshwar Kumar: भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत गणना केली जाते. यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार सध्या टॉपवर आहे. भुवनेश्वर कुमारनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. भुवीच्या क्रिकेटसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रंजक किस्से आहेत. भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागरनं (Nupur Nagar) एकदा त्याचं फेसबूक अकाऊंट (Facebook Account) हॅक केल्याचं त्यानं सांगितलं होतं, ज्याबद्दल आजही चर्चा केली जाते. 

क्रिकबझच्या यूट्यूब शोमध्ये आपल्या पत्नीचा उल्लेख करताना भुवनेश्वर कुमार म्हणाला होता की,"तिनं मला फेसबुकचा पासवर्ड विचारला, त्यावेळी मी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसऱ्या दिवशी तिनं माझ्या फेसबूक अकाऊंटचा पासवर्ड काय आहे? तो मला सांगितला. त्यानंतर मला मोठा धक्का बसला. तिनं अक्षरशः माझं खातं हॅक केलं होतं. तेव्हापासून मी फेसबुक वापरलं नाही", असं भुवनेश्वर कुमार म्हणाला होता. या शोमध्ये नुपूरही होती. "मी भुवनेश्वरला अनेकदा सांगितलं की, महिलांच्या इतक्या जवळून फोटो काढण्याची काय गरज आहे. त्यावेळी तो म्हणतो, जवळ येतात तर, मी काय करू. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर खूप मुली मॅसेज करायची. याचा पासवर्ड माझ्याकडं होता", असं नुपूर म्हणाली.

भुवनेश्वर आणि नुपूर लहानपणीचे मित्र
भुवनेश्वर आणि नुपूर हे लहानपणीचे मित्र होते आणि दोघांनी 23 नोव्हेंबर 2017 मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर भुवनेश्वरची पत्नी नुपूरनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या खाजगी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंह यांचं याच वर्षी  मे महिन्यात निधन झालं. त्याचे वडील दीर्घकाळापासून लिव्हरसंबंधित आजारांनी त्रस्त होते. 

भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय कारकिर्द-

क्रिकेट डाव विकेट्स एव्हरेज इकोनॉमी स्ट्राईक रेट 4W 5W
कसोटी 21 1,644 8/96 26.09 2.94 53.1 3
एकदिवसीय 121 4,951 5/42 35.11 5.08 41.4 4
टी-20 77 1,826 5/4 21.73 6.86 18.9 3


हे देखील वाचा-