Rohit Sharma IND vs AUS 3rd Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळला जात असून त्यात पुन्हा एकदा भारतीय कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीला तो मुकला होता. दुसऱ्या कसोटीत त्याने पुनरागमन केले, पण फलंदाजीत तो फ्लॉप ठरला. ॲडलेड कसोटीत त्याला दोन्ही डावात मिळून केवळ 9 धावा करता आल्या. याआधी गेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 11 होती.
आज गाबा कसोटी सामन्यात जिथे संघाला रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती तिथेही तो फेल ठरला. गाबा कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 10 धावा करून रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने रोहितला आपला शिकार बनवून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, त्यानंतर आता एका फोटोने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या फोटोनंतर रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
गाबा कसोटीतील 'त्या' एका फोटोमुळे क्रिकेट विश्वात खळबळ
गाबा कसोटीत भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्माने 27 चेंडूत केवळ 10 धावा केल्या आऊट झाला. यानंतर, पॅव्हेलियनकडे जात असताना त्याने ग्लोव्ह्ज काढून साईड स्क्रीनच्या मागे टाकले. त्यामुळे रोहित आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, अशी शक्यता चाहत्यांनी बांधली आहे. लोकांचा असा विश्वास आहे की रोहितने त्याची कसोटी कारकीर्द संपल्याचे संकेत दिले आहेत.
रोहितचा हा फोटो X वर शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'रोहित शर्माने साईड स्क्रीनच्या मागे ग्लोव्ह्ज सोडले. तो खूप नाराज आहे. हे निवृत्तीचे लक्षण आहे का?'
टी-20 मधून घेतली आहे निवृत्ती
रोहित शर्माने यापूर्वीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या वर्षी त्याने भारताला टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिल्यानंतरच त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. रोहित शर्माने 17 वर्षांनंतर भारताला टी-20 विश्वविजेते बनवले आणि त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शानदार शेवट केला. आता रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा -