Arshdeep Singh: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात इंग्लंडशी पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. तर, गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघात पदार्पणाची प्रतिक्षा करणाऱ्या अर्शदीप सिंहची भारतीय संघात एन्ट्री झालीय. आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळताना त्यानं डेथ ओव्हरमध्ये संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवलीय. 


आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अर्शदीप सिंहची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. परंतु, त्याला प्लेईंग इलेव्हन मध्ये स्थान मिळालं नाही. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यात त्याला भारतीय संघात स्थान मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, त्याच्याऐवजी उमरान मलिकला संधी देण्यात आली. अखेर इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली.


अर्शदीपची जबरदस्त कामगिरी
आयपीएलच्या मागीत दोन हंगामात अर्शदीप सिंहनं जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. अर्शदीप सिंहनं 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. आयपीएलमध्ये सर्वोत्तम डेथ ओव्हर गोलंदाजांपैकी एक म्हणून अर्शदीपचा उदय झाला आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामान त्यानं 12 सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं केवळ 7.69 च्या इकोनॉमीनं धावा खर्च केल्या, ज्या पंजाबच्या संघासाठी उपयुक्त ठरल्या.  


अर्शदीपची आयपीएलमधील कामगिरी
अर्शदीप सिंहनं आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 35 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.39 च्या इकॉनॉमीने 37 विकेट्स घेतल्या आहे. आयपीएलमध्ये एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यानं केलाय. 


हे देखील वाचा-