India Vs England T20 Series : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 7 जुलैपासून तीन टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताचं कर्णधारपद पुन्हा एकदा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) गेलं आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार म्हणून नव्हता. पण आता तो कोरोनामुक्त झाल्याने आगामी मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी तो पुन्हा कर्णधार झाला आहे. पण टी20 मालिकेतील सामने रोहितला खेळण्यासाठी कार्डिओव्हॅस्कुलर (cardiovascular test) ही चाचणी देणं गरजेचं आहे. याचा रिपोर्ट योग्य आल्यासच तो टी20 मालिकेत खेळू शकतो.


लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळताना रोहितला कोरोना झाला होता. त्यामुळे तो सध्या सुरु असलेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना खेळ नाही. पण बीसीसीआयने काही वेळापूर्वीच रोहित शर्मा कोरोनामुक्त झाला असून त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे. पण सोबतच बीसीसीआयच्या एका सूत्राने रोहित कोरोनामुक्त झाला असला तरी त्याला अजून संपूर्ण रिकव्हर होणं बाकी आहे. असंही सांगितलं आहे. तसंच कार्डिओव्हॅस्कुलर टेस्ट देणंही गरजेचं असल्याचं आता समोर आलं आहे.   


मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी रोहित शर्मा तयार


रोहित शर्मानं आता टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. रविवारी रोहित शर्मानं आर अश्विन आणि उमेश यादव यांच्या गोलंदाजीसमोर सराव केला. आर अश्विन आणि उमेश यादव बर्मिंगहॅम कसोटीत भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नाहीत. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. दरम्यान, बर्मिंगहॅम कसोटी खेळत असलेले विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंत यांना पहिल्या टी-20 सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. 


हे देखील वाचा-