ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळल्यानंतर दोन्ही देशांतील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. येत्या 7 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय संघाला दिलासा देणारी माहिती समोर आलीय. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून तो सराव करण्यासाठी मैदानात उतरलाय. रोहित शर्मानं रविवारी नेटमध्ये बऱ्याच वेळ सराव केला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित शर्माला बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं. 


इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लिसेस्टाशायर संघाविरुद्ध सराव सामना खेळला होता. या सराव सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग होता. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. तसेच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. बर्मिंगहॅमविरुद्ध महत्वाच्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह बर्मिंगहॅम कसोटीत भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. 


टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची तयारी
रोहित शर्मानं आता टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. रविवारी रोहित शर्मानं आर अश्विन आणि उमेश यादव यांच्या गोलंदाजीसमोर सराव केला. आर अश्विन आणि उमेश यादव बर्मिंगहॅम कसोटीत भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नाहीत.


टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाची कमान संभळणार
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाची कमान संभळणार आहे. दरम्यान, बर्मिंगहॅम कसोटी खेळत असलेले विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंत यांना पहिल्या टी-20 सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. 


हे देखील वाचा-