टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) खराब कामगिरीनंतर भारतानं न्यूझीलंडविरुद्ध (India Vs New Zealand) पहिल्या टी-20 मालिकेत 5 विकेट्स राखून विजय मिळवलाय. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतानं 3 सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. महत्वाचं म्हणजे, रोहित शर्मा आणि केएल राहुलनं (KL Rahul) न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत चमकदार कामगिरी केलीय.


रोहित शर्मानं आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध 15 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 400 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये तो या संघाविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे. रोहित शर्मानंही या संघाविरुद्ध 4 अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या 80 धावा आहे. तर, केएल राहुलनं न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यात राहुलनं 256 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यझीलंडविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 57 आहे. भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूच्या यादीत तो सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. 


दरम्यान, न्यूझीलंड संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केलेल्या धावांच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 10 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 311 धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. धोनीनं न्यूझीलंडविरुद्ध 11 सामन्यात 223 धावा केल्या. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA


हे देखील वाचा-