मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून भारताने (Team India) विश्वचषकावर आपले नाव कोरले. विश्वचषक जिंकून जवळपास महिना होत आला तरी देखील मुंबईकरांचा क्रिकेटचा फीवर अजूनही कमी झाला नाही. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ज्या शाळेत शिकला त्या शाळेत एका महिलेकडून एक कार T-20 वर्ल्ड कपच्या फोटोंचा वापर करुन सजवून आणण्यात आली होती. ज्यावर भारतीय संघाचे सर्व खेळाडू विश्वचषक घेताना दाखवण्यात आले होते. रोहित शर्माच्या शाळेत कार आणण्यात आली त्या यावेळी विद्यार्थ्यांकडून रोहित शर्माच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. हिटमॅनचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad)यांनी यावेळी रोहित शर्माकडून काय अपेक्षा आहेत हे सांगितलं.
मीना शहा यांनी टीम इंडियानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला त्यावेळच्या फोटोंचा वापर करुन कार सजवली होती. टी 20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची प्रतिकृती देखील त्या कारवर लावण्यात आली होती. यावेळी रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. रोहित शर्मानं देशाला आनंद दिला. देशातील कोट्यवधी जनतेला आनंद दिला, असंही दिनेश लाड म्हणाले.
रोहित शर्मानं भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि 2027 चा 50 षटकांचा विश्वचषक जिंकून द्यावा, अशी आशा व्यक्त केली. यासाठी कालच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला साकडं घातल्याचं दिनेश लाड म्हणाले. टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानं आपल्या देशाला आनंद मिळाला, 130 कोटी जनतेला रोहितनं आनंद दिला, असं दिनेश लाड म्हणाले. रोहित शर्मा आमच्या शाळेत शिकला, बाराव्या वर्षी शाळेत आला,शिकला मोठा झाला त्यामुळं बरं वाटलं, असं दिनेश लाड म्हणाला. दिनेश लाड यांनी यापुढं या शाळेत आल्यानंतर रोहित शर्मानं बॉलिंगचे धडे घेतले अन् तो बॅटसमन झाला, असं म्हटलं
रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिका खेळणार?
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारताची पहिलीच मालिका असल्यानं रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंची उपस्थिती महत्त्वाची ठरते. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचे वनडे सामने कमी असल्यानं रोहित शर्मा या मालिकेत खेळणार असल्याची माहिती आहे. रोहित शर्माकडे भारताच्या वनडे संघाचं कॅप्टनपद आहे. तर, टी 20 मालिकेत कोण भारताचा कॅप्टन कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :